- मुंबई - मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा पूर्णपणे ताबा अदानी समूहाने घेतला आहे. गेल्या वर्षांपासून या विमानतळाच्या खरेदीसाठी प्रक्रिया सुरू झाली होती. आता अखेर अदानी समूहाने जीव्हीके कंपनीकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे आता अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडकडे (एएएचएल) देशाचे सातवे विमानतळ आले आहे. त्यामुळे अदानी समूह देशातील सर्वात मोठा एअरपोर्ट ऑपरेटर बनला आहे. सविस्तर वृत्त -
- मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणारी माहिती समोर आली आहे. अनिल देशमुखांनी मुंबईतील बार मालकांकडून महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या एका पत्रातून केला होता. त्यानंतर सीबीआय, ईडीकडून सचिन वाझेसह, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची चौकशी सुरू झाली होती. आता सचिन वाझेने अनिल देशमुख यांना बार मालकांकडून वसूल करण्यात आलेले 4 कोटी 70 लाख रुपये दिले असल्याची माहिती समोर आली आहे. वाझे ही माहिती ईडीच्या चौकशीत दिली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.सविस्तर वृत्त -
- मुंबई - स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रखडलेल्या भरती तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना आयोगाला दिल्या आहेत. तसेच राज्यातील विविध विभागातील १५ हजार ७११ पदांच्या भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करण्याच्या सूचना देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वृत्त -
- पुणे - येथील एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या एका व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट टाकत पुण्याजवळच्या सासवड परिसरात विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. प्रफुल दादाजी मेश्राम (वय 46) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. सासवड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.सविस्तर वृत्त -
- यवतमाळ - केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना संधी न दिल्याने आमदार पंकजा मुंडे यांची नाराजी लपून राहिली नाही. मात्र, गोपीनाथ मुंडे यांनी बहुजन समाजाला एकत्र आणून भारतीय जनता पक्षाला वाढविले. हे कुणीही नाकारणार नाही. आमदार पंकजा मुंडे याच नाही, तर पुढील जन्मात भाजपमध्येच राहतील, असे मत माजी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. तसेच पंकजा मुंडेवर अप्रत्यक्ष बंडाची अशी वेळ आली नाही, असेही ते म्हणाले. सविस्तर वृत्त -
- पुणे - राज्यातील तुरुंगात असणाऱ्या हजारो कैद्यांसाठी तुरुंग प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तुरुंगातील कैद्यांना आता आवडीनुसार सर्व काही अन्नपदार्थ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामध्ये मांसाहारापासून ते मिठाईपर्यंतच्या सर्वच पदार्थांचा समावेश आहे. मात्र हे पदार्थ कैद्यांना विकत घेऊन खावे लागणार आहेत. राज्याचे तुरुंग महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी ही माहिती दिली. त्यामुळे येत्या काळात राज्यातील तुरूंगात हॉटेलचा फील आला तर आश्चर्य वाटायला नको. सविस्तर वृत्त -
- मुंबई - वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलने बहुप्रतिक्षित स्फुटनिक व्ही लसीकरण ड्राइव्ह यशस्वीरित्या सुरू केली आहे. दोन डोस दरम्यान 21 दिवसाचे अंतर भारतात मंजूर झाले आहे. यामुळे मुंबईकरांना लसीचे विविध पर्याय मिळाले आहेत. वॉकहार्ट मुंबई सेंट्रल येथील मॅनेजमेंटने स्फुटनिक व्ही सा ठी अर्ज केला होता. कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्फुटनिक व्ही या तीनही लसी मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये मुंबईकरांना उपलब्ध आहेत. यामुळे मुंबईतील अधिकाधिक लोकांचे लसीकरण करण्यास मदत होणार आहे. लसीकरण सकाळी 9.00 ते दुपारी 4: 00 या कालावधीत कोविन ॲपवर पूर्व नोंदणीसह उपलब्ध असेल. सविस्तर वृत्त -
- मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक असलेल्या औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने नोडल अधिकारी नेमले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही नेमणूक केल्याची माहिती राज्य शासनाने दिली. सविस्तर वृत्त -
- मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेले निर्बंध आता शिथिल होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील घटती रुग्णसंख्या, दुकाने, हॉटेल्सवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने कसे हटवता येतील, याबाबतचा सविस्तर अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज निर्बंध शिथिलतेचा होण्याची शक्यता आहे.सविस्तर वृत्त -
- गांधीनगर - महाराष्ट्र समाज भवनाचे उद्घाटन भाजपा अध्यक्ष सीआर पाटील आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या हस्ते झाले. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले नाही. ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या मार्गदर्शक सुचनांचे उघडपणे उल्लंघन झाले. सविस्तर वृत्त -
Top 10 @ 1 PM : दुपारी एकवाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या.. - Top 10 @ 7 AM
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
top ten

Last Updated : Jul 14, 2021, 12:59 PM IST