- नंदुरबार - धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील तोरणमाळ खडकी रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारी जीप खोल दरीत कोसळली. या अपघातात ६ मजुरांना जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक मजूर जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सविस्तर वाचा - नंदुरबार : मजुरांना घेऊन जाणारी जीप दरीत कोसळली, ६ जागीच ठार
- नागपूर - राज्यात 26 जानेवारीपासून कारागृह पर्यटन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. कारागृह पर्यटनासाठी खुले करण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याचे देशमुख यांनी सांगितले. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सविस्तर वाचा -देशातील पहिले कारागृह पर्यटन महाराष्ट्रात, 26 जानेवारीपासून होणार सुरूवात
- सांगली - पुणे-बंगळुरू महामार्गावर वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे सुमो गाडीचा टायर फुटून अपघात झाला. या अपघातात गाडीचा चालक श्रीकांत आण्णापा कुंभार (वय ५०, रा.अंकली ता.मिरज) व स्वप्नाली प्रमोद कुंभार (वय ३२, रा.इचलकरंजी, ता.हातकणंगले) हे दोघे ठार झाले तर, अन्य नऊ जण जखमी झाले. हे सर्वजण पुणे येथे मुलगी पाहण्यासाठी जात असताना शुक्रवारी हा अपघात घडला.
सविस्तर वाचा - मुलगी पाहण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात २ ठार, ९ जखमी
- सांगली - सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे, आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच झाडाचे पान का पडले, असे म्हणूनही भाजपा आंदोलन करू शकते, असा टोलाही पाटील यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरून भाजपाला लगावला आहे. वाळवा तालुक्यातील कुरळप येथे ते बोलत होते.
सविस्तर वाचा - 'झाडाचे पान का पडले, असे म्हणूनही भाजपा आंदोलन करू शकते'
- नाशिक - इंटरनेट आणि मोबाईल सारख्या डिजिटल युगात हस्ताक्षर मागे पडत चालल्याची खंत नाशिकच्या प्रसिद्ध सुलेखनकार पूजा गायधनी यांनी म्हटले आहे. हस्ताक्षर हे माणसाला समृद्ध करते त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना हस्ताक्षराची सवय लावावी, असे मत प्रसिद्ध सुलेखनकार पूजा गायधनी यांनी व्यक्त केले आहे.
सविस्तर वाचा - जागतिक हस्ताक्षर दिन; डिजिटल युगात हस्ताक्षर पडत चालले मागे
- नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात हिंसाचार घडवून आणण्याचा कट आखला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चार शेतकरी नेत्यांना ठार मारण्याचा कट असल्याची माहिती आंदोलनस्थळावरून ताब्यात घेतलेल्या एका संशयीत तरुणाने दिली. या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला माध्यमांसमोरही आणण्यात आले होते. यावेळी त्याने कटाची सविस्तर माहिती दिली.
सविस्तर वाचा - चार शेतकरी नेत्यांना ठार मारण्याचा कट, सिंघू सीमेवरून संशयीत ताब्यात
- सोलापूर - लॉकडाउनच्या काळात जून महिन्यापासून आजतागायत वीसहून अधिकवेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ झाल्यामुळे पेट्रोलच्या किमती ९१ ते ९३ रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. ही दरवाढ अशीच सुरू राहिली तर लवकरच पेट्रोल दराची 'सेंच्युरी' आणि वाहनधारकांची 'शंभरी' भरेल. इंधन दरवाढीविरोधात शहरातील मुख्य चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर बोंबाबोंब करून इंधन दरवाढीचा निषेध केला.
सविस्तर वाचा - इंधन दरवाढ विरोधात संभाजी ब्रिगेडचे पेट्रोल पंपावर 'बोंबाबोंब' आंदोलन
- वर्धा - बर्ड फ्ल्यू संबंधी वेगळा फार्स निर्माण झाला आहे. तो थांबवला गेला पाहिजे. देशात बर्ड फ्ल्यूने आजवर एकाही माणसाचा मृत्यू झालेला नाही. बर्ड फ्ल्यूनं एकाही माणसाचा मृत्यू झाला असेल तर शोधून द्या, शोधणाऱ्याला रोख रक्कम ताबडतोब बक्षिस म्हणून देण्यात येईल, असे म्हणत भीती न बाळगण्याचे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले आहे.
सविस्तर वाचा - बर्डफ्ल्यूचा फार्स दूर करा, याने माणूस मरत नाही- पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
- पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत आग लागलेल्या इमारतीची पाहणी केली. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. सीरमला लागलेल्या आगीत कोरोना लसीचे कोणतेही नुकसान झाले नसून ही आग घात की अपघात हे चौकशीनंतर कळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर वाचा - Serum Institute Fire : सीरमला लागलेल्या आगीचा लसीकरणावर परिणाम नाही - मुख्यमंत्री
- अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या ३० जानेवारीपासून आपल्या राळेगणसिद्धी गावात विविध कृषी मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करणार आहेत. हे उपोषण केंद्र सरकार विरोधात आहे. दिल्लीच्या सीमांवर अगोदरच कृषी कायदे मागे घ्यावेत, यासाठी दीर्घ आंदोलन एकीकडे सुरू असताना आता अण्णा हजारेही आंदोलन करणार असल्याने भाजप नेत्यांच्या गोटात काहीशी अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर अण्णांची मनधरणी करून त्यांनी आंदोलन करू नये, म्हणून भाजपचे राज्यातील नेते एक दिवसाआड राळेगणसिद्धी वारी करताना दिसत आहेत. आजही (शुक्रवारी) आमदार राधाकृष्ण विखे-पाटील हे राळेगणमध्ये पोहचले असून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेदेखील येत आहेत.
सविस्तर वाचा - राळेगणसिद्धीमध्ये भाजप नेत्यांची धावपळ; अण्णा हजारे उपोषणावर ठाम..!
- मुंबई - मुंबईत ड्रग्ज चे कारभार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो केला. घरातून चालणाऱ्या अमली पदर्थांच्या पेडलिंग च नेटवर्क उघडकीस आले. केंद्रीय यंत्रणांनी केलेल्या कारवाई वरून आता राज्यातील विरोधी पक्षाने महाविकस आघाडी सरकारला चांगलचं फैलावर घेतले आहे.
सविस्तर वाचा - अंमली पदार्थाचे कारखाने उभे राहत असताना महाराष्ट्र सरकार झोपले का? - भाजप