ETV Bharat / state

Top 10 @ 9 PM : रात्री नऊपर्यंतच्या ठळक बातम्या! - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top-ten-news-stories-around-the-globe
Top 10 @ 9 PM : रात्री नऊपर्यंतच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : Jan 17, 2021, 9:05 AM IST

Updated : Jan 17, 2021, 8:52 PM IST

  • मुंबई - आज (दि. १७ जाने.) राज्यात ३ हजार ८१ नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९ लाख ९० हजार ७५९ वर पोहोचला आहे. राज्यात आज (रविवार) ५० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ५० हजार ४३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३ टक्के एवढा आहे. राज्यात आज (रविवार) एकूण ५२ हजार ६५३ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सविस्तर वाचा - महाराष्ट्र कोरोना अपडेट - राज्यात ३ हजार ८१ नवे रुग्ण, ५० रुग्णांचा मृत्यू

  • बंगळुरू : हुतात्मा दिनादिवशीच महाराष्ट्राच्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकरांना कर्नाटक पोलिसांनी अडवल्याची घटना घडली आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले प्राण दिलेल्या महाराष्ट्र एकीकरण समीतीच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते बेळगावीला जात होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर निपाणी येथील कोगनोली टोलनाक्यावर त्यांना अडवण्यात आले.

सविस्तर वाचा - कर्नाटक पोलिसांची मुजोरी; हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जाणाऱ्या यड्रावकरांना सीमेवरच अडवले

  • अमरावती - औरंगाबाद शहराचा नामांतराचा वाद आता चांगलाच पेटला असून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये काँग्रेसवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले. आता शिवसेना ही ईडी आणि भाजपच्या प्रेशरमध्ये तर येत नाही ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा - 'शिवसेना ईडी - भाजपच्या प्रेशरमध्ये तर येत नाही ना'

  • मुंबई - शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पक्षाने हा निर्णय घेतल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे.

सविस्तर वाचा - शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढणार; संजय राऊतांची मोठी घोषणा

  • मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या काही दिवसांत जागतिक कच्च्या तेलाचे उत्पादन घटले. परिणामी, गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्याचा भार सामान्य नागरिकांवर पडत होता.

सविस्तर वाचा - पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केंद्र सरकारविरुद्ध मोर्चा

  • नागपूर - उपराजधानी नागपूरमध्ये वाहतूक पोलिसांच्या मदतीला 200 बॉडीवोर्न कॅमेरे देण्यात आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते या कॅमेरांचे वाटप करण्यात आले. या कॅमेराचा उपयोग पोलिसांवरील हल्ले रोखण्यास होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नवीन सुरुवात महाराष्ट्रात झाली असल्याचे अनिल देशमुख यांनी यावेळी म्हटले.

सविस्तर वाचा - उपराजधानीत वाहतूक पोलिसांच्या मदतीला 200 बॉडीवोर्न कॅमेरे

  • मुंबई - कोविन ॲपमध्ये राज्यात तांत्रिक अडचणी आल्या आहेत. या अडचणींबाबत केंद्र सरकारशी चर्चा केल्यावर कोरोनावरील लसीकरण पुन्हा सुरू केले जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. कोरोना लसीकरण थांबविले नसून सोमवारी किंवा मंगळवारी घेतले जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

सविस्तर वाचा - लसीकरण मोहीम रद्द नव्हे, २ दिवस स्थगित -आरोग्य विभागाचा खुलासा

  • मुंबई - पोलिसांचा सध्याचा गणवेश गैरसोईचा आहे. त्यामुळे गणवेशात बदल करावेत, अशी मागणी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीचा विचार करू, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र पोलीस खात्यातील माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी करू, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा - पोलिसांचा गणवेश बदलण्याच्या मागणीचा विचार करू - गृहमंत्री

  • परभणी - परभणी येथून 20 किलोमीटरवर असलेल्या झिरो फाटा येथील सुमारे पावणेचार एकर जमीन खरेदी प्रकरणात खासदार संजय जाधव यांनी संबंधित काळे कुटुंबाची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मात्र, खासदार संजय जाधव यांनी हा आरोप फेटाळून लावत, आपण ज्यांच्याकडून जमीन खरेदी केली, ते पुढे येत नसून त्यांचे कुटुंब मला ब्लॅकमेल करत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता संबंधित कुटुंबातील महिलांनी न्याय मिळविण्यासाठी थेट 'मातोश्री' वर धाव घेणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन काळे कुटुंबीयातील महिलांनी आपली बाजू मांडली.

सविस्तर वाचा - शिवसेना खासदारावर जमीन हडपल्याचा आरोप; परभणीतील कुटुंब न्यायासाठी जाणार 'मातोश्रीवर'

  • अहमदनगर - आज सुट्टीनिमित्ताने शिर्डीत भाविकांची साई दर्शनासाठी मोठी गर्दी झाली असून, दर्शनाचे पास घेण्यासाठी भाविकांना चार ते पाच तास रांगेत उभे रहावे लागत आहे. साई संस्थानच्या वतीने भाविकांच्या सुविधेची कुठालीही व्यवस्था केली जात नसल्याचा आरोप भाविकांनी केला आहे.

सविस्तर वाचा - शिर्डीत साई भक्तांची गैरसोय; दर्शनासाठी लागतोय 4 ते 5 तासाचा कालावधी

Last Updated : Jan 17, 2021, 8:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.