- नवी मुंबई-
खारघर मधील पांडवकडा धबधबा हा धोकादायक धबधबा म्हणून प्रशासनाने घोषित केला आहे. या धबधब्यावर जाऊ नये म्हणून पोलिसांकडून प्रवेश बंदी आदेश देखील जारी केलेला आहे. मात्र वर्षा पर्यटानाचा आनंद घेण्यासाठी रविवारी तब्बल 117 पर्यटक नियम मोडून या गोल्फ क्लब परिसरातील धबधब्यावर गेले होते. पंरतु अचनाक पावसाचा जोर वाढल्याने धबधब्याच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढली आणि हे सर्व पर्यटक अडकून पडले. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी अग्निशमन दलाच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन करून या पर्यटकांची सुटका केली आहे.
सविस्तर वाचा... - नवी दिल्ली -
कोरोना महामारीत लोकसभेचे दुसरे मान्सून अधिवेशन आजपासून म्हणजेच 19 जुलै रोजी सुरू होत आहे. हे अधिवेशन 13 ऑगस्टला समाप्त होण्याची शक्यता आहे. ही माहिती अधिकृत आदेशात देण्यात आली आहे. या पावसाळी अधिवेशनात 31 विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच कृषी कायदे, शेतकरी आंदोलन, चीन सीमा वाद, लसीकरण आणि इंधन वाढ आदी मुद्दे विरोधक उपस्थित करू शकतात.
सविस्तर वाचा... - नवी दिल्ली -
पंढरपूरमध्ये होणाऱ्या वार्षिक आषाढी एकादशी यात्रेत केवळ दहा पालख्यांना परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
सविस्तर वाचा... - जळगाव -
पंढरपूरच्या विठुरायाच्या आषाढी एकादशीच्या वारीसाठी आदिशक्ती संत मुक्ताई पालखी सोहळा मुक्ताईनगर येथून आज (सोमवारी) पहाटे 4 शिवशाही बसने रवाना झाला. कोरोनामुळे मर्यादा असल्याने यावर्षी देखील पालखी सोहळ्यात 40 वारकऱ्यांचा सहभाग आहे. या सर्व वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात लसीकरण झालेले व अहवाल निगेटिव्ह आलेल्या वारकऱ्यांना पालखी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली.
सविस्तर वाचा... - पंढरपूर (सोलापूर) -
आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने मोफत शिवशाही बस दिल्या आहेत. पंरपरेनुसार प्रतिवर्षी आषाढीला येणाऱ्या संतांच्या पालख्यांच्या भेटीला आणि स्वागताला पंढरपुरातून संत नामदेव महाराजांची पालखी वाखरीला जाते. वाखरी येथील संताचा मेळा पाहून सर्वच वारकरी आनंदून जातात. वाखरीतील संतांच्या भेटीचे महत्व सांगणारा ईटीव्ही भारतने केलेला हा विशेष वृत्तात..
सविस्तर वाचा... - पंढरपूर (सोलापूर) -
दिल्लीमध्ये राज्यातील नेते राजकीय भेटीसाठी ये-जा करत असतात, मात्र चार-पाच खासदारांवर केंद्रात सत्ता येत नसते. लग्नाचा मांडव उभारणी करताना देखील जास्त टेकू असतात, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाच्या पाहणी दौर्यासाठी पंढरपूर येथे आले असता, त्यांनी यावेळी बोलताना सरकारसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.
सविस्तर वाचा... - मुंबई -
राज्यात रविवारी (दि. १८ जुलै) ९ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. १ जुलैला ९ हजार १९५ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र, आज पुन्हा ९ हजार रुग्ण आढळून आले आहेत.
सविस्तर वाचा... - पुणे -
दुर्दैवाने आज मोदी सरकारच्या काळात या सर्व चौकशा सोडल्या आहेत. एखाद्याच्या अंगावर कुत्रा सोडल्यासारख्या चौकशा सुरू करायच्या आणि अंतिम निर्णय कुठेच घ्यायचा नाही. अशा पद्धतीने केंद्राकडून ईडीच्या चौकशा सुरू आहेत. अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पुण्यातील काँग्रेस भवन येथे पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
सविस्तर वाचा... - नंदुरबार-
तोरणमाळहून खडकी पॉईंट येथून सिंधी येथे जाताना क्रुझर गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील तोरणमाळ खोऱ्याचा अतिदुर्गम भाग असणाऱ्या सिंदिदिगर घाटात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी क्रुझर गाडीला अपघात झाला. या अपघातात पंधराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्तांना दरीतून बाहेर काढण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सविस्तर वाचा... - नवी दिल्ली -
इस्रायली स्पायवेअरने देशातील दोन केंद्रीय मंत्री, 40 हून अधिक पत्रकार, तीन विरोधी नेते, एक न्यायाधीश, भारतातील 300 व्यापारी आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याची माहिती एका आंतरराष्ट्रीय मीडिया संघटनेने समोर आणली आहे. केवळ सरकारी संस्थांना विकल्या जाणाऱ्या इस्रायली गुप्तचर स्पायवेअरने हेरगिरी केली आहे. इस्रायली सॉफ्टवेअर पेगाससच्या माध्यमातून भारतीय नेते, पत्रकार आणि इतरांचे फोन हॅक केल्याचे म्हटलं आहे. हा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. तथापी, भारत सरकारने या दाव्यांना निराधार म्हटले आहे.
सविस्तर वाचा...
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या..
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना, पाऊस यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
19 जुलै दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या

Last Updated : Jul 19, 2021, 1:29 PM IST