ETV Bharat / state

'या' १७ जागांवर उद्या होणार मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला - gopal shetti

लोकसभेच्या चौथ्या आणि राज्यातील अंतिम टप्प्यातल्या १७ जागांसाठी उद्या (सोमवारी) मतदान होणार आहे. थ्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

'या' १७ जागांवर उद्या होणार मतदान
author img

By

Published : Apr 28, 2019, 10:02 AM IST

मुंबई - लोकसभेच्या चौथ्या आणि राज्यातील अंतिम टप्प्यासाठी उद्या (सोमवारी) मतदान होणार आहे. यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण तीन टप्यांमध्ये ३१ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले आहे. चौथ्या टप्प्यातील १७ जागांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

मुंबईतील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण या मतदारसंघासह नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरूर, शिर्डी या १७ मतदारसंघात उद्या मतदान होत आहे.

१७ जागांवर होणाऱ्या लढती

नंदुरबार -

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, २०१४ च्या मोदी लाटेत या ठिकाणी कमळ फुलले. यावेळी काँग्रेस पक्षाकडून आमदार के. सी. पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते सुहास नटावदकर यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे.

धुळे -

धुळे हा खान्देशातील एक महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आजवर हा जिल्हा विकासापासून कोसो दूर राहिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या मतदारसंघातील विविध प्रश्न आणि विकासाचे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी या मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना तर काँग्रेसने कुणाल पाटील यांना मैदानात उतरवले आहे. तर या दोघांसमोर भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटेंचे आव्हान असणार आहे.

दिंडोरी -

दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या भारती पवार तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे धनराज महाले यांच्यात मुख्य लढत होत आहे. तर माकपच्या जीवा पांडू गावित यांनी या दोघांसमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे.

नाशिक -

नाशिक लोकसभेसाठी महाआघाडीकडून राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ, भाजप - शिवसेना युतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे, वंचित बहुजन आघाडीकडून माजी नगरसेवक पवन पवार तर भाजपचे बंडखोर आमदार माणिकराव कोकाटे अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

पालघर -

पालघर लोकसभा मतदारसंघात 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये खरी लढत आहे ती महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित विरुद्ध बहुजन विकास आघाडी पुरुस्कृत महाआघाडीचे बळीराम जाधव यांच्यात. ही लढत अत्यंत तुल्यबळ मानली जात असल्याने निवडणुकीत रंग चढला आहे.

भिवंडी -

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ समजली जात आहे. येथून युतीकडून पुन्हा भाजपचे कपिल पाटील हे तर आघाडीकडून काँग्रेसचे सुरेश टावरे हे मैदानात उतरलेत. तर वंचित आघाडीकडून अरुण सावंत हे निवडणुक लढवत असल्याने भिवंडी लोकसभेसाठी रंगत निर्माण झाली आहे.

कल्याण -

कल्याण लोकसभेसाठी शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील, वंचित आघाडीचे संजय हेडावू यांच्यासह तब्बल २८ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत ही विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि बाबाजी पाटील यांच्यात आहे.

ठाणे -

ठाणे मतदारसंघात यावेळीही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी शिवसेनकडून विद्यमान खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद पंराजपे हे रिंगणात आहेत. २०१४ च्या मोदी लोटेत शिवसेनेच्या राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांचा तब्बल २ लाख ८५ हजार मतांनी पराभव केला होता.

मावळ -

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघ हा जोरदार चर्चेत आला आहे. शिवसेनेचे बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहे. तर त्यांच्या समोर शिवसेनेचे विद्यामान खासदार श्रीरंग बारणे यांचे तगडे आव्हान असणार आहे.

शिरुर -

शिरूर लोकसभा मतदारसंघाची सध्या महाराष्ट्रभर जोरदार चर्चा आहे. येथून युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे चौथ्यांदा तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना मैदानात उतरले आहे. अमोल कोल्हेंना निवडणुकीच्या रणांगणात उतरवून आढळराव पाटलांसमोर राष्ट्रवादीने मोठे आव्हान निर्माण केले आहे. यावेळेस आढळराव पाटील चौकार मारणार की अमोल कोल्हे त्यांनी क्लिन बोल्ड करत दिल्ली गाठणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शिर्डी -

यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. यावेळी शिवसेनेकडून विद्यमान सदाशिव लोखंडे तर काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे हे निवडणूक लढवत आहेत. तर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे अपक्ष निवडणूक लढवत असल्याने रंगत निर्माण झाली आहे.

मुंबई उत्तर -

मुंबई उत्तर मतदारसंघाची यावेळी जोरदार चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. कारण काँग्रसेने येथून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहे. त्यांच्या समोर भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचे मोठे आव्हान आहे.

मुंबई उत्तर पश्चिम -

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, २०१४ मध्ये शिवसेनेच्या गजानक किर्तीकर यांनी तब्बल १ लाख ८३ हजार मतांनी गुरूदास कामत यांचा पराभव केला होता. यावेळी येथून पुन्हा गजानन किर्तीकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय निरुपम हे निवडणूक लढवत आहेत.

मुंबई उत्तर पूर्व -

मुंबईचा उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ मतदारांनी कोणत्या एका राजकीय पक्ष किंवा पुढाऱ्याची मक्तेदारी होऊ दिलेला नाही. प्रत्येक निवडणुकीत येथील खासदार बदलत असल्याने हा मतदारसंघ कोणत्याही एका पक्षाचा बालेकिल्ला होऊ शकला नाही. या मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीकडून संजय पाटील हे मैदानात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून निहारिका खोंदले निवडणूक लढवत आहेत.

मुंबई उत्तर मध्य -

मुंबई उत्तर-मध्य हा लोकसभा मतदारसंघ तसा काँग्रेसचा गड मानला जात होता. या मतदारसंघातून आतापर्यंत ४ वेळा काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. मात्र, २०१४ च्या मोदी लाटेत पूनम महाजन यांनी मुंबई उत्तर-मध्यचा हा काँग्रेसचा गड प्रिया दत्त यांच्याकडून हिरावून घेतला होता. आता पुन्हा एकदा भाजपकडून पूनम महाजन आणि काँग्रेसकडून प्रिया दत्त या आमने-सामने उभ्या आहेत.

मुंबई दक्षिण मध्य -

दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. येथे शिवसेना खासदार राहुल शेवाळे, काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि वंचित बहुजन आघाडीचे संजय भोसले यांच्यात सरळ लढत होणार आहे. येथील सामजिक प्रश्नांपेक्षा जातीय समीकरणेच या उमेदवारांना निवडून आणण्यास कारणीभूत ठरणार आहेत.

मुंबई दक्षिण -

मुंबईतील दक्षिण-मुंबई लोकसभा मतदारसंघ हा उच्चभ्रू, मध्यमवर्गीय ते झोपडपट्टीवासीय अशी मिश्र वस्ती असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात देशातील अग्रणी उद्योगपतीही राहतात. यावेळीही येथून शिवसेनेचे विद्यामान खासदार अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्यात लढत होत आहे. २१०४ च्या निवडणुकीत अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरांचा तब्बल सव्वा लाख मतांनी पराभव केला होता.

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.