ETV Bharat / state

गणेशोत्सवासाठी कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ - मुंबई-कोल्हापूर मार्ग

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात गणेशोत्सवा निमित्त कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांचा टोल माफ करण्यात येणार असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

गणेशोत्सवासाठी कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ
author img

By

Published : Aug 26, 2019, 6:19 PM IST

मुंबई- कोल्हापूर मार्गे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गाड्यांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रालयात दिली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात गणेशोत्सवा निमित्त कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर पाटील यांनी ही घोषणा केली. यंदा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मात्र, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी रस्ते सुस्थितीत करण्यात आले आहेत. काही ठिकाणी किरकोळ कामे सुरू असून, ते तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याचबरोबर अनेक भाविक मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जात असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱया वाहनांचा टोल माफ करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पावसाने उघडीप दिल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामही जलदगतीने सुरु असून, जिथे रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, तिथे आवश्यकतेनुसार, रोड स्ट्रीप्स, सूचना करणारे बोर्ड, गावांची नावे, जंक्शन बोर्ड, रॅम्बलर पट्टी, गतीरोधक लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती, मंत्री पाटील यांनी यावेळी दिली.

या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण राज्य मंत्री रविंद्र वायकर, गृह राज्यमंत्री दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक, रस्ते विभागाचे सचिव सी.पी.जोशी, सार्वजनिक बांधकाम इमारत विभागाचे सचिव अजित सगणे यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Intro:गणेशोत्सवासाठी कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ

- चंद्रकांत पाटील

मुंबई २६

कोल्हापूर मार्गे कोकणात गणेशउत्सवासाठी जाणाऱ्या गाड्यांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रालयात दिली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांच्या दालनात गणेशोत्सवा निमित्त कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा आढावा घेण्यात आला .या बैठकीनंतर पाटील यांनी ही घोषणा केली . यंदा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे . मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी रस्ते सुस्थितीत करण्यात आले आहेत. काही ठिकाणी किरकोळ कामे सुरू असून, ते तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याचबरोबर अनेक भाविक मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जात असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मुंबई -कोल्हापूर मार्गे कोकणात जाणा-यां वाहनांना टोल माफ करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले .

पावसाने उघडीप दिल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामही जलदगतीने सुरु असून, जिथे रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, तिथे आवश्यकतेनुसार, रोड स्ट्रीप्स, सूचना करणारे बोर्ड, गावांची नावे, जंक्शन बोर्ड, रॅम्बलर पट्टी, गतीरोधक लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मंत्री पाटील यांनी यावेळी दिली.

या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण राज्य मंत्री रविंद्र वायकर, गृह राज्यमंत्री दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक, रस्ते विभागाचे सचिव सी.पी.जोशी, सार्वजनिक बांधकाम इमारत विभागाचे सचिव अजित सगणे यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.