- नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये या महिनाअखेरीस विधासभा निवडणुकांसाठी मतदान सुरू होईल. सध्या या दोन्ही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील भाजपाचा प्रचार करण्यासाठी आज (गुरुवार) या दोन राज्यांमध्ये असणार आहेत.
वाचा सविस्तर - पंतप्रधान मोदी आसाम-बंगाल दौऱ्यावर; भाजपाचा करणार प्रचार
- गांधीनगर : गुजरातच्या वडोदरामध्ये असलेल्यी विजय वल्लभ रुग्णालयाला बुधवारी रात्री आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दहा गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या रुग्णालयामध्ये एकूण २३ रुग्ण होते.
वाचा सविस्तर - गुजरातमधील रुग्णालयाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
- मुंबई : राज्यात बुधवारी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. राज्यात बुधवारी 23 हजार 179 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर 24 तासांत 84 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात मृत्युदर 2.24 टक्के इतका आहे. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्याने राज्याची चिंता वाढली आहे.
वाचा सविस्तर - बापरे! राज्यात बुधवारी 23 हजार 179 नवे कोरोनाग्रस्त
- हैदराबाद - राजस्थानमधील प्रत्येक गावाची एक वेगळी गोष्ट आहे. काही गोष्टी रोमांचकारी आहेत तर, काही भितीदायक. राजस्थानमधील चूरू जिल्ह्यातील सरदार शहरात घरावर दुसरा मजला बनवण्यास बंदी आहे. चिरू जिल्ह्यातील उडसर गावात कितीही उंचीवरून बघितले तरी कोणत्याच घरावर दुसरा मजला दिसणार नाही.
वाचा सविस्तर - राजस्थानातील शापित गावाची अजब गोष्ट!
- मुंबई : मालाड येथील कुरार पोलिसांनी एका गांजा तस्कराला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा तरुण सिव्हिल इंजिनिअर आहे. भाजी विकण्याच्या आडून तो गांजाची विक्री करत होता. होळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गांजा विकण्याची त्याची योजना होती.
वाचा सविस्तर - अमली पदार्थ विकणारा 'सिव्हिल इंजिनअर' पोलिसांच्या ताब्यात; ६३ किलो गांजा जप्त
- नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजेच बुधवारी तब्बल 3 हजार 370 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.
वाचा सविस्तर - नागपुरात लॉकडाऊनमध्येही कोरोनाचा उद्रेक; बुधवारी आढळले तब्बल ३,३७० नवे रुग्ण
- कोल्हापूर : आमदार नितेश राणे यांनी शिवसेना, ठाकरे कुटुंबाच्या बाबतीत तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्याबाबत व्यक्तव्य केल्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातील युवासेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आली.
वाचा सविस्तर - नितेश राणे यांच्या आरोपानंतर कोल्हापूरात तीव्र पडसाद; राणेंच्या पुतळ्यांना जोडे मारून केले दहन
- मुंबई : सचिन वाझे प्रकरणावरून आक्रमक झालेल्या भाजपच्या नेत्यांकडून सातत्यानं राज्य सरकारवर टीका केली जात आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली आहे. मुंबई पोलिसांचे एवढे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती अशी टीका त्यांनी केली आहे.
वाचा सविस्तर - मुंबई पोलिसांची एवढी बदनामी कधीच झाली नाही, शेलार यांची महाविकास आघाडीवर टीका
- सोलापूर - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केला. कर्ज फेडण्यासाठी आणि शेतात विहीर खोदण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. या त्रासाला कंटाळून पत्नी जयश्री संतोष सुतारने 2016मध्ये विष पिऊन स्वतःची जीवन यात्रा संपवली.
वाचा सविस्तर - पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला पाच वर्षे सक्तमजुरी
- मुंबई : परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या 12 मीटर लांबीच्या आणि 36 आसन असलेल्या टुरिस्ट बसला केंद्र शासनाने मोठा दणका दिला आहे. महाराष्ट्र शासनाने या बसेसवर आक्षेप घेतल्यानंतर केंद्राने यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्राच्या नव्या आदेशानुसार 12 मीटर लांब बसेसमधून आता 36 स्लिपर आसन क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करता येणार नाही
वाचा सविस्तर -आता 13.5 मीटर लांब बसेसनाच 36 बर्थची परवानगी, राज्याच्या विनंतीनंतर केंद्राचा दणका