ETV Bharat / state

Top 10 @ 9 AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... - pandharpur news

सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...वाचा एका क्लिकवर

सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...
सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...
author img

By

Published : Jul 1, 2020, 9:06 AM IST

मुंबई - आषाढी वारीनिमित्त यंदाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, राज्यासह जगाला कोरोनामुक्त कर, असे साकडे विठ्ठल-रुक्मिणी मातेला घातले आहे...जगभर प्रसिद्ध असणाऱ्या लालबाग राजाने देखील थाटामाटातील गणेशोत्सव रद्द करून 11 दिवस रक्त दान व प्लाझमा थेरेपी उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. आज झालेल्या ‘लालबागच्या राजा’च्या मंडळ बैठकीत पदाधिकारी व सदस्य यांनी हा निर्णय घेतला.. यासह सकाळी ९ पर्यंतच्या १० महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

पंढरपूर - दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा कोरोनामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मिळाला. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा करणारे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे तिसरे तर ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती ठरली.

वाचा सविस्तर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

पंढरपूर - आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, राज्यासह जगाला कोरोनामुक्त कर, असे साकडे विठ्ठल-रुक्मिणी मातेला घातले आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. पूजेनंतर ते बोलत होते.

वाचा सविस्तर-विठ्ठला, राज्यासह जगाला कोरोनामुक्त कर; मुख्यमंत्र्याचे विठ्ठलाला साकडे

मुंबई- मुंबई महानगर क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी आजपासून महाविद्यालयाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यात सर्व महाविद्यालयात असलेल्या व्यवस्थापन कोट्यांच्या आणि ऑनलाइन प्रवेशाच्या जागांची माहिती ऑनलाइन पध्दतीने संकलित केली जाणार आहे. त्यासोबतच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य आणि अकरावी प्रवेशाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

वाचा सविस्तर -आजपासून अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी महाविद्यालयांची नोंदणी सुरु

मुंबई - अभियांत्रिकी तंत्रशिक्षण अधिक क्षेत्रातील आयआयटीमधील शिक्षण मिळावे, असे स्वप्न हजारो विद्यार्थी उराशी बाळगतात. परंतु अनेकांना ते स्वप्न पूर्ण करता येत नाहीत. मात्र अशा विद्यार्थ्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच आयआयटीमधून बीएस्सीची ऑनलाईन पदवी घेण्याची संधी मिळणार असून यासाठीची सुरुवात लवकरच आयआयटी मद्रासमधून होणार आहे.

वाचा सविस्तर -पहिल्यांदाच आयआयटीमध्ये मिळणार बी.एस्सी. पदवीचे ऑनलाईन शिक्षण

मुंबई - सध्या महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट असल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला गणेश मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. जगभर प्रसिद्ध असणाऱ्या लालबाग राजाने देखील थाटामाटातील गणेशोत्सव रद्द करून 11 दिवस रक्त दान व प्लाझमा थेरेपी उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. आज झालेल्या ‘लालबागच्या राजा’च्या मंडळ बैठकीत पदाधिकारी व सदस्य यांनी हा निर्णय घेतला. कोरोनाचा संकटात संपूर्ण जग लढा देत असताना सरकारला सहकार्य करणं कर्तव्य आहे. म्हणून, हा निर्णय घेतला असल्याचे पदाधिकाऱयांनी सांगितले.

वाचा सविस्तर -थाटामाटातील लालबागचा राजा गणेशोत्सव रद्द , मंडळ साजरा करणार 'आरोग्य उत्सव'

मुंबई - आषाढीच्या वारीनिमित्त यंदा वारी निघणार नाहीये तर ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका थेट पंढरपूरला जाणार आहेत. असं असलं तरीही वारकऱ्यांच्या मनातील भक्तीभाव मात्र तसुभर देखील कमी झालेला नाही. त्यांच्याच मनातील भावनेला वाट मोकळी करून देण्याचं काम केलं आहे ते अभिनेता कवी संकर्षण कऱ्हाडे याने.

वाचा सविस्तर -आषाढी वारीनिमित्त संकर्षण कऱ्हाडे विचारतोय 'पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं हाय का..?'

नाशिक - जिल्ह्यातील पिंपळगाव येथे एका दुभत्या गाईच्या पोटात तब्बल ३५ किलो प्लास्टिक आढळून आले. पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या गायीवर शस्त्रक्रिया करून प्लास्टिक आणि इतर वस्तूंचा साठा बाहेर काढला आहे. सुरुवातीला आजारी गायीची मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने तपासणी केल्यानंतर तिच्या पोटात लोखंडी तुकडे आणि प्लास्टिकसारखे घातक पदार्थ असल्याचे आढळून आले होते. तब्बल तीन तास शस्त्रक्रिया करून या गायीचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

वाचा सविस्तर -धक्कादायक..! गाईच्या पोटातून काढले तब्बल ३५ किलो प्लास्टिक; २ नाण्यांसह पतंगाचा मांजाही आढळला

कोल्हापुर - कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी मानवी प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून महाराष्ट्रातील पाच कोटी जनतेला आर्सेनिक अल्बम व आयुर्वेदिक औषधे मोफत देणार असल्याची माहिती, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिली. शिवाय औषधे खरेदीचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदांना असल्याचेही त्यांनी म्हटलं. आज सायंकाळी उशिरा मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

वाचा सविस्तर - 'प्रतिकार शक्ती वाढण्यासाठीचे औषध ५ कोटी ग्रामीण जनतेला मोफत'

नाशिक - विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धान खरेदीला मुदतवाढ देण्याची राज्य शासनाने केंद्राकडे मागणी केलेली होती. त्यामुळे केंद्र शासनाने रब्बी हंगामातील धान खरेदीला 31 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली

वाचा सविस्तर - विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; धान खरेदीला केंद्रशासनाकडून ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

मुंबई - राष्ट्रीय डॉक्टर दिन हा दरवर्षी १ जुलैला साजरा करण्यात येतो. आपल्या अमूल्य सेवेसाठी डॉक्टरांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री आणि नावाजलेले डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे आयोजन करण्यात येते.

वाचा सविस्तर -आज राष्ट्रीय डॉक्टर दिन, जाणून घ्या का साजरा करतात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.