1st Semifinal INDvsNZ LIVE : भारत - न्यूझीलंड सामन्यात पावसाचा व्यत्यय, खेळ थांबला
मँचेस्टर - सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा पहिला उपांत्य सामन्याला सुरुवात झाली आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये हा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगला असून स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहलीने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आजच्या सामन्यातही संघात स्थान दिलेले नाही.तर, चहलने कुलदीप यादवच्या जागी संघात पुनरागमन केले आहे. वाचा सविस्तर...
अमरावतीत चाकून गळा चिरून विद्यार्थीनीची हत्या; रुग्णालय परिसरात तणावाची परिस्थिती
अमरावती - शहरातील चुनाभट्टी परिसरात तरुणाने एका विद्यार्थीनीवर चाकूने हल्ला केला. यामध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर...
बैल चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांने कुटुंबीयांना नांगराला जुंपत केली पेरणी, पोलिसांनी दखल न घेतल्याचा आरोप
नंदुरबार - शेतातून १ लाख रुपये किंमतीच्या बैलांची चोरी झाल्यानंतर माणिक पाटील या शेतकऱ्यांने याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. मात्र, पोलिसांनी याची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांने आपल्या कुटुंबीयांना नांगराला जुंपत पेरणीला सुरुवात केली आहे. वाचा सविस्तर...
मनसेकडून मध्य रेल्वेला अल्टिमेटम, समस्या न सोडवल्यास 'खळ्ळ खट्याक' चा इशारा
मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित राज ठाकरे यांनी आज त्यांच्या शिष्टमंडळासह मध्य रेल्वेच्या मुख्यालयात भेट दिली. यावेळी रेल्वेच्या विविध समस्यांबाबत मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक आर. बद्री नारायण यांना मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले. वाचा सविस्तर...
'बिग बॉस'नंतर सुरेखा पुणेकरांची राजकारणात जाण्याची इच्छा
मुंबई - लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा 'बिग बॉस सिझन -२' मधील प्रवास संपला आहे. बिग बॉसच्या घरात त्यांनी सहा आठवडे घालवले होते. या काळात चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. बिग बॉस चे हे घर म्हणजे भांडण तंटे आणि ताणतणाव असलेले घर आहे. या तणावामुळेच मी माझ्यातली क्षमता जास्त दाखवू शकली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 'सांस्कृतिक कट्टा' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वाचा सविस्तर...