मुंबई - मान्सून देशभरात सक्रीय झाला आहे. उत्तर भारतात १२ दिवस आधिच दाखल झालेल्या मान्सूनचा आता आसाममध्ये कहर सुरू आहे.. आसाममध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 15 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.. तर राज्यातील तिवरे धरण फुटीच्या दुर्घटनेला १ वर्ष पूर्ण झालेय... मुंबईतही आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे... यासह राज्य देशभरातील महत्वाच्या १० बातम्या वाचा एका क्लिकवर..
गुवाहटी (आसाम)- राज्यातील पूर परिस्थितीमुळे आणखी सात जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 15 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. महापुरामुळे रस्ते, पूल आणि इतर इमारतींचे नुकसान झाले आहे, असे सरकारच्या वतीने बुधवारी सांगण्यात आले. आतापर्यंत एकूण 33 लोकांचा मृत्यू झालाय तर 24 ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
वाचा सविस्तर - आसाममध्ये महापुरामुळे आणखी 7 जणांचा मृत्यू; 15 लाख लोकांना पुराचा फटका
रत्नागिरी- जिल्ह्यातल्या चिपळून तालुक्यातील तिवरे धरण फुटी दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे ही घटना झाली होती. धरण फुटीने धरण परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांची झोप उडाली होती. या दुर्घटनेत अनेक संसार उध्वस्त झाले, शेती वाहून गेली, होत्याचे नव्हते झाले. तो दिवस आठवला की आजही इथल्या ग्रामस्थांच्या अंगाचा थरकाप उडतो.
वाचा सविस्तर - ईटीव्ही भारत विशेष: तिवरे धरण दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण...
मुंबई - आज (गुरुवारी) मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर येत्या दोन दिवसांत (2 आणि 3 जुलै) मुंबईत मुसळधार तर कोकणात अति मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन दिली. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
वाचा सविस्तर - आज मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत जोरदार पावसाची शक्यता
रत्नागिरी - तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं. या दुर्घटनेत कोणी आपला भाऊ गमावला, कोणी आई-वडील, कोणी मुलगा तर कोणी अख्ख कुटुंब गमावलं. अजित चव्हाण यांच्या तर संपूर्ण कुटुंबावरच काळाने घाला घातला. या दुर्घटनेत अजित चव्हाण यांनी आई-वडील, भाऊ, भावजय गमावली, चिमुकली पुतणी दुर्वा आजही बेपत्ता आहे. या सर्वांची उणीव नेहमी जाणवत असल्याचं अजित चव्हाण सांगतात, विशेष म्हणजे मोठ्या भावाचा मोठा आधार आपल्याला होता, पण आज तोही या जगात नाही, त्यामुळे आपला आधारच हरपल्याची भावना अजित चव्हाण यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.
वाचा सविस्तर - ईटीव्ही भारत विशेष : तिवरे धरण दुर्घटना - 'दुर्वा आजही बेपत्ता, आठवणीने डोळे पाणावतात'
रत्नागिरी - जिल्ह्यातल्या चिपळून तालुक्यातील तिवरे धरण फुटी दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. 2 जुलै 2019 ची अमावस्येच्या रात्री चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आणि धरणानजीक वसलेल्या भेंदवाडीचे होत्याचे नव्हते झाले. भेंदवाडीतील 22 घरे, जनावरांचे गोठे आणि 22 जण या पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले होते. या दुर्घटनेत एकूण 22 जण बेपत्ता झाले होते. 22 पैकी 21 मृतदेह सापडले. मात्र, तेव्हा दीड वर्षांची असणारी दुर्वा अद्यापही बेपत्ता आहे. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले अरुण पुजारे यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने बातचित केली. या बातचित दरम्यान, त्यांनी आपण डोळ्यासमोर मृत्यू पाहिल्याचे सांगितले.
वाचा सविस्तर - तिवरे धरण दुर्घटना : होय, मी मृत्यू डोळ्यासमोर पाहिला - अरुण पुजारे
मुंबई - कोरोनाचे आज नवे 1 हजार 511 रुग्ण आढळून आले असून 78 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 78 हजार 708 वर तर मृतांचा आकडा 4 हजार 629 वर पोहचला आहे. आतापार्यंत 44 हजार 791 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने मुंबईत सध्या 29 हजार 288 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 57 टक्क्यांवर पोहचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
वाचा सविस्तर - मुंबईत नव्या 1 हजार 511 कोरोना रुग्णांची भर ; तर 78 जणांचा बळी
हैदराबाद - कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग त्रस्त झाले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी औषध तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दरम्यान, भारत बायोटेकने 'कोव्हॅक्सीन' या नावे स्वदेशी लस तयार केली आहे. या लसीला भारतीय औषध महानियंत्रक (डीजीसीआय) ने मानवी चाचण्या घेण्यास परवानगी दिली आहे. या संदर्भात ईटीव्ही भारतशी, भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर कृष्णा ईला यांनी मुलाखत दिली. यात त्यांनी लस विकसित करताना आलेली आव्हाने, चाचण्या आणि लसीबद्दल बऱ्याच मुद्यावर भाष्य केले. आपण लसीच्या यशस्वी प्रयोगाच्या जवळ असल्याचे ईला म्हणाले. तसेच त्यांनी पुढील वर्षापर्यंत 1.3 बिलियन लोकांपर्यंत ही लस पोहोचवणे शक्य असल्याचे सांगितले. दरम्यान, जुलैपासून भारतात कोव्हॅक्सीनच्या चाचण्या सुरु होतील. पाहा डॉ. कृष्णा इला यांची संपूर्ण मुलाखत...
पाहा सविस्तर-Exclusive Interview : जगातील सर्वास स्वस्त कोरोना लसीचे उत्पादन करण्याचे भारत बायोटेकचे लक्ष्य
मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्चपासून राज्यात लॉकडाऊन होते. राज्य सरकारने आता अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. अटी आणि शर्तीसह सलून ब्युटी पार्लर सुरू करण्यास 28 जूनला परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी ग्राहकांना सलूनमध्ये जाण्यापूर्वी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. अशा मार्गदर्शक सूचना मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जाहीर केल्या आहेत. तसे परिपत्रकही आयुक्तांनी काढले आहे.
वाचा सविस्तर - अपॉइंटमेंट असेल तरच मिळणार ब्यूटीपार्लर, सलूनमध्ये प्रवेश; पालिकेची नियमावली
नाशिक - आपण आजपर्यंत लग्नाची वरात ही घोड्यावरुन चारचाकी अथवा मोटर सायकल वरून किंवा जास्तीत जास्त विमान किंवा हेलिकॉप्टर मधून निघाल्याचे बघितले असेल. मात्र कधी नवरदेव नवरीने बैलगाडीने आपल्या लग्नाची वरात काढल्याचे बघितलं नसेल. मात्र नाशिकच्या सिडको भागातील मोरवाडी परिसरात राहणाऱ्या अमोल नामदेव सोनवणे यांनी आपल्या नवविवाहित वधू हर्षदा नामदेव गामणे-सोनवणे हिला चक्क बैलगाडीतून वरात काढत आपल्या घरी आणले आहे.
वाचा सविस्तर - शेतकरी असल्याचा अभिमान... नवविवाहित दाम्पत्याची वरात बैलगाडीतून नवरदेवाच्या दारात
सोलापूर - एका 23 वर्षीय मुलाने 45 वर्षीय महिलेचा गळा दाबून खून केल्याची घटना होटगी रोड परिसरात घडली आहे. नागदेवी गुरूपादय्या स्वामी असे खून झालेल्या महिलेचे नाव असून सैफअली अशरफ शेख असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
वाचा सविस्तर - किरकोळ कारणावरुन वाद; 23 वर्षीय मुलाने केला महिलेचा गळा दाबून खून