ETV Bharat / state

पवारांचे अचूक टायमिंग! ईडीची पीडा राष्ट्रवादीच्याच पथ्थ्यावर?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडीने शरद पवारांविरोधात तक्रार दाखल केली. पवारांनीही हीच संधी हेरत, ईडीच्या कार्यालयात आपण स्वत: जावून पाहूणचार घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मरगळ आलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही उसळून उठले. राज्यभरात कार्यकर्ते ईडी आणि भाजप सरकार विरोधात त्वेशाने रस्त्यावर उतरलेत.

शरद पवार
author img

By

Published : Sep 27, 2019, 1:11 PM IST

Updated : Sep 27, 2019, 4:03 PM IST

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडीने शरद पवारांविरोधात तक्रार दाखल केली. पवारांनीही हीच संधी हेरत, ईडीच्या कार्यालयात आपण स्वत: जावून पाहूणचार घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मरगळ आलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही उसळून उठले. राज्यभरात कार्यकर्ते ईडी आणि भाजप सरकार विरोधात त्वेशाने रस्त्यावर उतरले. शिवसेना ही पवारांच्या समर्थनार्थ पुढे आली. संपूर्ण माध्यमांचे लक्ष पवारांवर केंद्रीत झाले. त्यामुळे ही तक्रार राष्ट्रवादीच्यात पथ्थ्यावर पडणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.

राजकारणात कधी काय करावे याचे अचूक टायमिंग साधण्यात शरद पवार माहिर मानले जातात. भाजप सरकार विरोधकांना संपवण्यासाठी ईडीचा वापर करते असा सर्रास आरोप होतो. त्यात थेट पवारांविरोधातच ईडीने तक्रार दाखल केल्याने भाजप सरकारच सध्या बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे. राज्यात भाजप सेनेच्या बाजूने चित्र आहे. माध्यमांचेही लक्ष या दोनच पक्षांच्या भोवती फिरत आहे. ईडीने केलेल्या कारवाईनंतर पवार केंद्र स्थानी आले आहे. संपूर्ण राज्यात पवारांचीच चर्चा आहे. कार्यकर्त्यांमध्ये या घटनेने जोश भरला आहे. प्रत्येक ठिकाणी सरकार विरोधात आंदोलने होताना दिसत आहे. मुंबईतही कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. सरकार सुडबुद्धीने कारवाई करत आहे हा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यात सध्या तरी राष्ट्रवादीला यश आले आहे.

हेही वाचा - शरद पवारांना अडचणीत आणणारी ‘ईडी’ नक्की आहे तरी काय?

हेही वाचा - पवारांची पॉवर..! ईडी नरमली, म्हणाले तूर्तास चौकशीची गरज नाही

केंद्रातील नेत्यांनाही याची दखल घ्यावी लागली आहे. त्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेही पवारांचीच बाजू लावून धरल्यामुळे भाजपला सावध भूमिका घ्यावी लागते. राज्याच्या राजकारणात पवारांची उंची मोठी आहे. त्यामुळे थेट त्यांच्या विरोधात उगारलेला कारवाईचा बडगा सरकारवरच उलटू शकतो असे राजकीय तज्ञांना वाटते. सध्या वातावरण निर्मिती करण्यात निश्चितच पवारांना यश आले आहे. मात्र याचा फायदा विधानसभा निवडणुकीत ते कितपत उचलतात हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, निवडणुकीसाठी जे मैदान लागते ते मैदान सरकारनेच त्यांना आयते करून दिले आहे. त्यावर आता पवार कशी बॅटींग करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 27, 2019, 4:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.