मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यात शुक्रवारी नव्या 15 हजार 817 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, दिवसभरात 11 हजार 344 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सातत्याने होणारी कोरोना रुग्णांची वाढ.ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.
हेही वाचा - वझेंची एकाच दिवशी दुसऱ्यांदा बदली, नियंत्रण कक्षातून आता नागरी सुविधा केंद्रात
राज्यातील कोरोनाची स्थिती -
राज्यात 11 हजार 344 रुग्ण 24 तासात कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 21 लाख 17 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
राज्यात नव्या 15 हजार 817 रुग्णांची नोंद झाली.
राज्यात 56 रुग्णांचा म्रुत्यु झाला.
राज्यात एकूण 22 लाख 82 हजार 191रुग्णांची नोंद झाली.
राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 1 लाख 10 हजार 485 इतकी झाली.
राज्यातल्या मोठ्या शहरातील मागच्या 4 दिवसातील कोरोनास्थिती
नागपूर
राज्याची उपराजधनी असलेल्या नागपूरमधून कोरोना काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. प्रशासनानं नागपूरमध्ये 15 ते 21 मार्च दरम्यान लॉकडाऊन केला आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार मागच्या पाच दिवसात नागपूर शहरामध्ये रुग्ण संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. नागपूरध्ये पाच दिवसात 7 हजार 008 जण कोरोनाबाधित झाले आहेत. हा आकडा चिंता वाढवणारा आहे
मुंबई-
राजधानीत कोरोना ठाण मांडून बसला आहे. मुंबईत पाच दिवसात 6721 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. मुंबईत कोणतेही नवे निर्बंध नसले तरी 5 रुग्ण आढळलेली इमारत मात्र सील केली जात आहे.
पुणे-
पुण्यात कोरोनाचा फैलाव वेगाने झाला आहे. पुण्यात मागील पाच दिवसात 6635 रुग्णांची नोंद झाली. पुण्यात कडक निर्बंध आणले आहेत. पुण्यात रात्री 11 ते 6 पर्यंत लॉकडाऊन आहे. शाळा महाविद्यालंय 31 मार्चपर्यंत बंद आहेत. संध्याकाळी उद्यानं बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.
औरंगाबाद-
इतर शहरांच्या तुलनेत औरंगाबादची स्थिती काही निराळी नाही. औरंगाबादमध्ये शनिवार आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. इतर दिवशी रात्री 11 ते 7 असा लॉकडाऊन असणार आहे. तर 7 दिवसांसाठी APMC बंद ठेवण्यात आली आहे. औरंगखबाद शहरात पाच दिवसात 2 हजार 311 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
नाशिक-
नाशिकमध्ये देखील कडक निर्बंध आहेत. संध्याकाळी 7 ते सकाळी 7 नाशिकमध्ये लॉकडाऊन आहे. मंगलकार्यांना 30 जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर मंगलकार्यालयांमध्ये 15 मार्चनंतर लग्नाला परवानगी नाही. नाशिक हे मंदिरांचे शहर आहे. मात्र, धार्मिक स्खळं शनिवारी आणि रविवारी पूर्णवेळ बंद असणार आहेत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार नाशिक शहरात पाच दिवसात 2,705 रुग्णांची नोंद झाली आहे.
हेही वाचा - मी क्राईम ब्रांचमधून मुक्त झालो - सचिन वझे
राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 1,547
ठाणे- 169
ठाणे मनपा- 301
नवी मुंबई-247
कल्याण डोंबिवली- 428
पनवेल मनपा- 108
नाशिक-263
नाशिक मनपा-715
मालेगाव मनपा-101
अहमदनगर- 388
अहमदनगर मनपा-113
धुळे मनपा- 135
जळगाव- 688
जळगाव मनपा- 376
पुणे- 578
पुणे मनपा- 1,845
पिंपरी चिंचवड- 841
सातारा - 155
औरंगाबाद मनपा- 609
जालना-225
बीड - 164
नांदेड मनपा- 218
अकोला-108
अकोला मनपा- 208
अमरावती- 209
अमरावती मनपा- 251
यवतमाळ-455
बुलडाणा-390
वाशिम - 180
नागपूर- 338
नागपूर मनपा-1729
हेही वाचा - 'एमपीएससी'ची नवी तारीख जाहीर, मात्र गोंधळ कायम