ETV Bharat / state

मुंबईत आज कोरोनाचे 348 नवे रुग्ण, 7 रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Jan 25, 2021, 9:30 PM IST

आज मुंबईत सर्वात कमी रुग्णांची नोंद झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आज 348 नवे रुग्ण आढळून आले असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

today corona patient update in mumbai
मुंबईत आज कोरोनाचे 348 नवे रुग्ण, 7 रुग्णांचा मृत्यू

मुंबई - आज कोरोनाचे 348 नवे रुग्ण आढळून आले असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 6 हजार 393 वर पोहचला आहे. आज 7 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 307 वर पोहचला आहे. आज सर्वात कमी रुग्णांची नोंद झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

कोरोना रुग्णांची आकडेवारी -

मुंबईत आज 508 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 88 हजार 023 वर पोहचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 486 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 173 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 2 हजार 084 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 27 लाख 17 हजार 291 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395 तर आज 24 जानेवारीला 348 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा -मराठी साहित्य संमेलनाचं 'स्वागताध्यक्ष'पद हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान - छगन भुजबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.