ETV Bharat / state

Communal Violence In Maharashtra : महाराष्ट्रात सातत्याने होतो आहे जातीय हिंसाचार, 2023 मध्ये घडल्या 'या' मोठ्या घटना - Kolhapur violence

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी जातीय हिंसाचार घडतो आहे. या घटनांसाठी विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षाला जबाबदार धरत आहेत. तर राज्यकर्ते परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी निवडणुका पाहता या घटनांमागे राजकीय फूस असावी, अशी शंका देखील आता व्यक्त करण्यात येत आहे.

Communal Violence In Maharashtra
महाराष्ट्रात जातीय हिंसाचार
author img

By

Published : Jun 7, 2023, 8:18 PM IST

मुंबई : कोल्हापुरात काल सोशल मीडियावर मुघल शासक औरंगजेबाचा गौरव करणाऱ्या पोस्टवरून दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. पोस्टमध्ये लोक औरंगजेब आणि टिपू सुलतानचे पोस्टर लावून जल्लोष करताना दिसत होते. यावरून येथे दगडफेकही झाली. त्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली. पोलिसांनी हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, आंदोलक ठाम असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. या घटनेनंतर राजकीय नेत्यांनी शांततेचे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी दंगली : या सर्व घडामोडी पाहता आणि कोल्हापुरातील सध्याची परिस्थिती पाहता यामागे राजकीय फूस असावी, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी आपली कंबर कसली आहे. प्रत्येक पक्ष आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडताना दिसत आहेत. या घटनांसाठी विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षाला जबाबदार धरत आहेत. तर राज्यकर्ते परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

त्र्यंबकेश्वर येथे मंदिरात प्रवेश करण्यावरून वाद : 13 मे रोजी संध्याकाळी शहरातील एका समाजाच्या नेतृत्वाखाली निघालेल्या धार्मिक मिरवणुकीत 25-30 हून अधिक लोक सहभागी झाले होते. जेव्हा ही मिरवणूक त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर आली तेव्हा काही तरुणांनी मंदिराच्या उत्तरेकडील दरवाजातून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवले आणि पायऱ्या चढण्यास मनाई केली. मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या सूचना फलकावर म्हटले आहे की, गैर-हिंदू मंदिराच्या आवारात प्रवेश करू शकत नाहीत. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अहमदनगर आणि अकोल्यात दंगली : मे महिन्यात अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव गावात मिरवणुकीदरम्यान झालेल्या जातीय संघर्षात किमान पाच जण जखमी झाले होते. यावेळी झालेल्या दगडफेकीत अनेक दुकाने आणि वाहनांचेही नुकसान झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी आतापर्यंत 32 जणांना ताब्यात घेतले असून 150 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याच दरम्यान सोशल मीडियावरील धार्मिक पोस्टवरून अकोल्यातील जुन्या शहर परिसरात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. या घटनेत दोन पोलिसांसह आठ जण जखमी झाले होते. हिंसाचारात दंगलखोरांनी काही दुचाकी आणि चारचाकी गाड्याही जाळल्या.

जळगाव जिल्ह्यात जातीय हिंसाचार : 3 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे जातीय हिंसाचार उसळला. येथे प्रार्थनास्थळासमोर डीजे संगीतासह धार्मिक मिरवणूक काढण्यात आली होती. संगीत वाजवण्यावरून झालेल्या वादातून हाणामारी झाली. त्यानंतर तिचे रुपांतर दगडफेकीत झाले, असे पोलिसांनी सांगितले. एका समाजाची घरे लुटल्याचा आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याचा स्थानिकांचा आरोप असताना पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

संभाजीनगरात दोन गटांत हाणामारी : 31 मार्च रोजी संभाजीनगरात राम मंदिराजवळ दोन गटात हाणामारी झाली. यात सुमारे 500 लोकांच्या जमावाने दगडफेक आणि पेट्रोल भरलेल्या बाटल्या फेकल्याने 10 पोलिसांसह 12 जण जखमी झाले. यावेळी बदमाशांनी सुमारे 13 वाहने देखील जाळली.

हेही वाचा :

  1. Dhule News: धार्मिक स्थळी केली मूर्तीची विटंबना, तीन संशयितांना अटक
  2. कोल्हापूरमधील इंटरनेट बंद, गृहविभागाचे आदेश, मुख्यमंत्री गृहमंत्र्यांचेही परिस्थितीवर लक्ष
  3. Kolhapur Bandh: कोल्हापूर बंदमध्ये तणावाचे वातावरण? 'अशी' आहे आंदोलन स्थळावरील परिस्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.