मुंबई Narendra Modi Yogi Adityanath Threat : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने जीवे मारण्याची (PM Narendra Modi Threat) धमकी दिली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कामरान अमिर खान नावाच्या तरुणाला मंगळवारी चुनाभट्टी येथून अटक करण्यात आली (Mumbai Police) आहे. त्याची प्रकृती ठीक नसल्याने तो जे जे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेला होता. मात्र, कामरानला उपचार चांगले न मिळाल्याने त्याने हा हॉक्स कॉल केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच आरोपी कामरानचे वैद्यकीय उपचाराच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु असल्याची माहिती आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांनी दिली.
काय दिली होती धमकी? : आझाद मैदान पोलीस सूत्रांनी सांगितले की, कामरान खानने सोमवारी सायंकाळी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि धमकी दिली की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गुंडाने त्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यास सांगितले.
आरोपीला चुनाभट्टी परिसरातून अटक : त्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी कॉलरचा माग काढला आणि त्याला मुंबईतील चुनाभट्टी परिसरातून ताब्यात घेतले. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी अटक आरोपी कामरान खानविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम ५०५ (१) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.अटक आरोपी कामरान हा सायन येथे राहणारा असून बेरोजगार आहे.
का करतात हॉक्स कॉल? : याआधीही राजकारणी, बिझनेसमॅन, सेलिब्रिटी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. मात्र, हे सर्व हॉक्स कॉल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. मानसिक तणावातून किंवा रागातून अशा प्रकारचे हॉक्स कॉल केले जात असल्याची माहिती तज्ञांनी दिली. तसेच अशा प्रकारचे हॉक्स क़ॉल करणाऱ्यांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढलेली असल्याचे दिसून आले.
हेही वाचा -