ETV Bharat / state

आचारसंहिता : यावर्षी पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालेय वस्तू मिळणार नाहीत - विद्यार्थी

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. मात्र यावर्षी आचारसंहिता असल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू मिळणार नसल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी दिली

शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक
author img

By

Published : May 29, 2019, 8:17 AM IST

मुंबई - महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. मात्र यावर्षी आचारसंहिता असल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू मिळणार नसल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी दिली. महत्वाचे म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे मागील तीन वर्षांपासून या वस्तू शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळाल्या आहेत. मात्र यावर्षी आचारसंहितेमुळे विद्यार्थ्यांना वस्तू मिळणार नाहीत.

महापालिकेच्या शाळांतील इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पालिका प्रशासनाकडून 27 प्रकारचे शालेय वस्तू दिल्या जातात. सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नामुळे मागील तीन वर्षापासून या वस्तू शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळाल्या आहेत. मात्र यंदा आचारसंहितेचे कारण पुढे करत या वस्तू खरेदीच्या निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. याबाबतचा प्रस्ताव या महिन्याच्या शेवटी मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. त्यानंतर त्याचा आदेश निघणार असल्याने, दप्तर, युनिफॉर्म आदी महत्वाच्या शालेय वस्तू विद्यार्थ्यांना वेळेत वस्तू देणे शक्य नसल्याचे नाईक यांनी सांगितले. या वस्तू विद्यार्थ्यांना जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात मिळण्याची शक्यता नाईक यांनी वर्तवली आहे.

विद्यार्थ्यांना पैसे नाही -
केंद्र आणि राज्य सरकारने लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ देण्याची योजना आखली आहे. या योजनेनुसार 27 वस्तूंपैकी काही वस्तूंचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करावेत, असा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला होता. 2 लाख 70 हजार विद्यार्थ्यांपैकी अद्याप 1 लाख विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणे शक्य नसल्याचे कारण देत या प्रस्तावाला विरोध करण्यात आला. यामुळे आता या वस्तू विद्यार्थ्यांना ऑगस्ट महिन्यात देण्यात येतील, असे नाईक यांनी सांगितले.

Intro:मुंबई -
मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. मात्र या वर्षी अचारसंहिता असल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू मिळणार नसल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी दिली.Body:महापालिकेच्या शाळांतील इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पालिका प्रशासनाकडून २७ शालेय वस्तू दिल्या जातात. सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नामुळे मागील तीन वर्षापासून या वस्तू शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळाल्या आहेत. मात्र यंदा आचारसंहितेचे कारण पुढे करीत या वस्तू खरेदीच्या निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. याबाबतचा प्रस्ताव या महिन्याच्या शेवटी मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. त्यानंतर त्याचे कार्यादेश निघणार असल्याने दप्तर, युनिफॉर्म आदी महत्वाच्या शालेय वस्तू विद्यार्थ्यांना वेळेत वस्तू देणे शक्य नसल्याचे नाईक यांनी सांगितले. या वस्तू जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात मिळण्याची शक्यता नाईक यांनी वर्तवली आहे.

विद्यार्थ्यांना पैसे नाही -
केंद्र आणि राज्य सरकारने लाभार्थ्यांच्या बँक आकाऊंटमध्ये थेट लाभ देण्याची योजना आखली आहे. या योजनेनुसार 27 वस्तूंपैकी काही वस्तुंचे पैसे विद्यार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करावेत असा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला होता. 2 लाख 70 हजार विद्यार्थ्यांपैकी अद्याप 1 लाख विद्यार्थ्यांचे अकाऊंट उघडण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांच्या अकाऊंट मध्ये पैसे जमा करणे शक्य नसल्याचे कारण देत या प्रस्तावाला विरोध करण्यात आला. यामुळे आता या वस्तुंची विद्यार्थ्यांना ऑगस्ट महिन्यात देण्यात येतील असे नाईक यांनी सांगितले.

शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांची बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.