मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पुण्यातील देहू येथील मंदिराच्या लोकार्पण समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने भाजवर टिकास्त्र सोडले. खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी देखील ट्विटरवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. त्या म्हणाल्या की, देवेंद्रजींनी थेट देशाच्या पंतप्रधानांचे प्रोटोकॅाल तोडले. स्थानिक आमदार, खासदार, नगराध्यक्षांचे पासेस गायब केले. उपमुख्यमंत्र्यांचे नाव भाषणाच्या यादीतून काढले. पक्षाच्या नेत्यांना व्यासपीठ आणि स्वागताला उभे केले. खुर्चीसाठी हा माज बरा नव्हे.
-
देवेंद्रजींनी थेट देशाच्या पंतप्रधानांचे प्रोटोकॅाल तोडले. स्थानिक आमदार,खासदार,नगराध्यक्षांचे पासेस गायब केले.उपमुख्यमंत्र्यांचे नाव भाषणाच्या यादीतुन काढले.पक्षाच्या नेत्यांना व्यासपीठ आणि स्वागताला उभे केले. खुर्चीसाठी हा माज बरा नव्हे. देवेंद्र फडणवीसांची चौकशी व्हायालाच हवी.
— Deepali Sayed (@deepalisayed) June 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">देवेंद्रजींनी थेट देशाच्या पंतप्रधानांचे प्रोटोकॅाल तोडले. स्थानिक आमदार,खासदार,नगराध्यक्षांचे पासेस गायब केले.उपमुख्यमंत्र्यांचे नाव भाषणाच्या यादीतुन काढले.पक्षाच्या नेत्यांना व्यासपीठ आणि स्वागताला उभे केले. खुर्चीसाठी हा माज बरा नव्हे. देवेंद्र फडणवीसांची चौकशी व्हायालाच हवी.
— Deepali Sayed (@deepalisayed) June 16, 2022देवेंद्रजींनी थेट देशाच्या पंतप्रधानांचे प्रोटोकॅाल तोडले. स्थानिक आमदार,खासदार,नगराध्यक्षांचे पासेस गायब केले.उपमुख्यमंत्र्यांचे नाव भाषणाच्या यादीतुन काढले.पक्षाच्या नेत्यांना व्यासपीठ आणि स्वागताला उभे केले. खुर्चीसाठी हा माज बरा नव्हे. देवेंद्र फडणवीसांची चौकशी व्हायालाच हवी.
— Deepali Sayed (@deepalisayed) June 16, 2022
देवेंद्र फडणवीसांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नव्हता, तर खासगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खासगी कार्यक्रमाला नाही. शिवाय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणासाठी विनंती केली पण त्यांनी नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील राजभवन येथील एकच कार्यक्रम सरकारी होता, तेथे प्रोटोकॉल प्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषण झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झालेले नाही, असा खुलासा भाजपकडून करण्यात आला आहे.
Navneet Rana Statement : विधान परिषद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना बसणार फटका, राणा दाम्पत्याची टीका