ETV Bharat / state

मालेगाव बॉम्बस्फोट संदर्भात माझ्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही- लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित

मालेगाव बॉम्बस्फोट 2008 प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित व अजय एकनाथ राहिरकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी या दोघांना न्यायालयाने बॉम्बस्फोट संदर्भात काही प्रश्न विचारले. मात्र, याबद्दल माझ्याकडे बोलण्यासारखे काहीही नाही, असे उत्तर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी दिले.

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित
author img

By

Published : Jun 13, 2019, 7:46 PM IST

मुंबई - आज मुंबईतील विशेष न्यायालयात मालेगाव बॉम्बस्फोट 2008 प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित व अजय एकनाथ राहिरकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी या दोघांना न्यायालयाने बॉम्बस्फोट संदर्भात काही प्रश्न विचारले. मात्र, याबद्दल माझ्याकडे बोलण्यासारखे काहीही नाही, असे उत्तर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी दिले.

आज झालेल्या सुनावणीत विशेष न्यायालयाने लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मालेगाव बॉम्बस्फोट झाला, या बद्दल तुम्हाला काही माहिती आहे? आणि आतापर्यंत किती साक्षीदारांची साक्ष झाली आहे?, असे प्रश्न न्यायालयाने त्यांना विचारले.

यावेळी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी 'I HAVE NOTHING TO SAY ( या बद्दल माझ्याकडे बोलण्यासारखे काहीही नाही)' असे उत्तर दिले आहे. तर अजय राहिरकर या आरोपीने 'या घटनेतील साक्षीदारांची साक्ष खरी असून मालेगाव बॉम्बस्फोटाची घटना खरी आहे', असे उत्तर दिले.

मालेगाव बॉम्बस्फोट संदर्भात साध्वी प्रज्ञा सिंह म्हणतात...
दरम्यान 7 जून रोजी झालेल्या मुंबईतील विशेष न्यायालयात इतर आरोपींसह साध्वी प्रज्ञा सिंग हजर झाल्या होत्या. 2008 साली मालेगाव बॉम्बस्फोट झाला याबद्दल काही माहिती होती का? असा प्रश्न न्यायालयाने आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना विचारला होता. यावेळी 'मला याबद्दल काहीही माहीत नाही', असे साध्वी यांनी म्हटले होते. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी समीर कुलकर्णी याने 'हे वास्तव आणि सत्य आहे', असे उत्तर दिले होते. याचबरोबर या प्रकरणातील आणखीन एक आरोपी दयानंद पांडे याने 'याबद्दल मला काहीही माहिती नसून मालेगावचे नाव मी पहिल्यांदाच ऐकले होते', असे उत्तर दिले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मृतांचे नातेवाईक, डॉक्टर, मेडिकल ऑफिसर, जखमी यांचे जबाब नोंदवले आहेत. तुम्हाला माहिती आहे का? किती साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहेत? असा प्रश्न न्यायालयाने आरोपींना केला होता. यावर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी किती झाल्या माहीत नाही, मात्र साक्षी झाल्यात हे माहीत आहे', असे उत्तर दिले होते.

Intro:2008 मालेगाव बॉम्बब्लास्ट संदर्भात आज मुंबईतील विशेष न्यायालयात या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित व अजय एकनाथ राहिरकर या दोघांना न्यायालयाने मालेगाव बॉम्ब ब्लास्ट संदर्भात काही प्रश्न विचारले . ज्यावर या दोन्ही आरोपीनी उत्तर दिली आहेत.
Body:आज झालेल्या सुनावणीत विशेष न्यायालयाने लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यास मालेगाव बॉम्बब्लास्ट झाला या बद्दल तुम्हाला काही माहिती आहे ? आता पर्यंत किती साक्षीदारांची साक्ष झाली आहे ? असे प्रश्न विचारले असता यावर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित I HAVE NOTHING TO SAY ( या बद्दल माझ्याकडे बोलण्यासारखे काहीही नाही.) असे उत्तर दिले आहे. तर अजय राहिरकर या आरोपीने बोलताना म्हटले आहे की या घटनेतील साक्षीदारांची साक्ष खरी असून मालेगाव बॉम्ब ब्लास्ट ची घटना घडली असून खरी आहे.
Conclusion:दरम्यान 7 जून रोजी झालेल्या मुंबईतील विशेष न्यायालयाच्या सुनावणीत साध्वी प्रज्ञा सिंग सुनावणी हजर झाली होती . या सुनावणीत न्यामुर्तींनी साध्वी प्रज्ञा सिंगसह इतर आरोपीनाही काही प्रश्न विचारले होते. ज्यात 2008 साली मालेगाव बॉम्बस्फोट झाला याबद्दल काही माहिती होती का ? असा प्रश्न न्यायालयाने कोर्टात हजर असलेल्या आरोपीना विचारला असता यावर आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर मला याबद्दल काहीही माहीत नाही असं म्हटलं आहे. तर याच प्रकरणातील दुसरा आरोपी समीर कुलकर्णी याने न्यायालयाच्या प्रश्नावर हो हे वास्तव आहे आणि सत्य आहे अस उत्तर दिले. या प्रकरणातील आणखीन एक आरोपी दयानंद पांडे याने याबद्दल मला काहीही माहित नसून मालेगाव चे नाव मी पहिल्यांदाच ऐकले होते.

मालेगाव ब्लास्ट प्रकरणात मृतांचे नातेवाईक, डॉक्टर , मेडिकल ऑफिसर , जखमी यांचे जबाब नोंदवले आहेत . तुम्हाला माहीत आहे का किती साक्षीदारांचे साक्ष नोंदवली आहेत ? असा प्रश्न न्यायालयाने आरोपीना केल्यावर साध्वी प्रज्ञा सिंग हिने माहीत नाही , साक्षी झाल्यात माहीत आहे . पण किती जनांच्या साक्षी झाल्यात माहीत नाही अस उत्तर दिले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.