ETV Bharat / state

काँग्रेस राजवटीचे काम वाखाण्याजोगे, काहींना याचे विस्मरण - दिलीप वळसे पाटील - IndiaAt75

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. या ७५ वर्षांत कॉंग्रेसच्या राजवटीत उद्योग, शेती, तंत्रज्ञान यासह सर्वच क्षेत्रात आपल्या देशातील लोकांनी काम केल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आज (रविवारी) उत्साहात साजरा करण्यात आला.

The work of 75 years of Congress rule is commendable - Home Minister
काँग्रेस राजवटीचे काम वाखाण्याजोगे, काहींना याचे विस्मरण - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
author img

By

Published : Aug 15, 2021, 1:41 PM IST

मुंबई - स्वातंत्र्यपूर्व काळापासून आत्तापर्यंतचे काँग्रेस राजवटीत उद्योग, शेती, तंत्रज्ञान यासह सर्वच क्षेत्रात आपल्या देशातील लोकांनी वाखाण्याजोगे काम केले. काहींना याचे विस्मरण होऊ लागले आहे. परंतु, ७५ वर्षांत केलेले काम आपल्या स्मरणात राहिले पाहिजे. त्याच दिशेने व पध्दतीने येत्या काळात काम करायचे आहे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदोत व हे स्वातंत्र्य असेच तेवत राहो, अशा शब्दांत गृहमंत्री पाटील यांनी राज्यातील जनतेला यावेळी शुभेच्छा दिल्या.

'पुढचा स्वातंत्र्य दिन यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने'

स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्यांना अभिवादन करतानाच कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत. दीड वर्षांत सर्व कर्मचारी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांनी आपत्तीवर मात करण्याचे काम केले. त्यातून परिस्थिती बदलली आहे. पुढचा स्वातंत्र्य दिन आपल्याला यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल, अशी अपेक्षा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण -

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. या ७५ वर्षाच्या कॉंग्रेसच्या राजवटीत उद्योग, शेती, तंत्रज्ञान यासह सर्वच क्षेत्रात आपल्या देशातील लोकांनी काम केल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आज (रविवारी) उत्साहात साजरा करण्यात आला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर मुंबई विभागीय कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केले. माजी आमदार विद्या चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर आदींसह पक्षाचे मुंबई व प्रदेशचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्तांकडून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत; 3 कोटी 41 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

हेही वाचा - पुढचा स्वातंत्र्यदिन कोरोना निर्बंधाविना साजरा करण्याचा निश्चय करूया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.