ETV Bharat / state

धावत्या बेस्ट बसचे टायर निघाले ! जीवितहानी नाही - mumbai kurla Depot news

मुंबईत यावर्षी पालिकेकडे खड्ड्यांबाबत ४३३ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी बहुतांश तक्रारींवर पालिकेने कारवाई करत खड्डे बुजवले आहेत. त्यानंतरही मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्डे असल्याने अपघात होत आहेत. शुक्रवारी अंधेरी कुर्ला रोडवर आगरकर चौक येथे बेस्ट बसचे पुढचे चाक निघाल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

The tire of the best bus ran out on mumbai
धावत्या बेस्ट बसचा टायर निघाला ! जिवीतहानी नाही
author img

By

Published : Sep 5, 2020, 7:46 AM IST

मुंबई -पावसाळ्यात रस्त्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करत गाडी चालवावी लागते. तरीही खड्ड्यांमुळे अपघात होत असतात. आज सकाळी अंधेरी कुर्ला रोडवर आगरकर चौक येथे बेस्ट बस नंबर ३३२ या बसचे पुढचे चाकच निघाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

कुर्ला आगाराची मार्ग क्र. ३३२ ही बस अंधेरी-कुर्ला रोडवरुन सकाळी ९.३० वाजता लोकमान्य टिळक उड्डाण पुलावर आली. याच वेळी रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे पुलावर वळण घेताना बसचे पुढचे टायर निघाले. रस्त्यावर खड्डे असल्याने व रस्त्याची अवस्था खराब झाल्याने हा अपघात झाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोणीही प्रवासी जखमी झाला नसल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडतात. या खड्ड्यांमधून मार्ग काढत चालकांना वाहने चालवावी लागतात. या दरम्यान खड्डे वाचवताना आणि खड्ड्यात वाहनाचे चाक गेल्याने दुर्घटना घडतात. त्यात विशेषकरून दुचाकी स्वार जखमी होतात. तर एखाद्याचा मृत्यूही होतो. मुंबईत यावर्षी पालिकेकडे खड्ड्यांबाबत ४३३ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी बहुतांश तक्रारींवर पालिकेने कारवाई करत खड्डे बुजवले आहेत. त्यानंतरही मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्डे असल्याने अपघात होत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.