मुंबई - महाराष्ट्र शासनाने एका अद्यादेशाद्वारे केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) राज्यात तपास करण्याची परवानगी काढून घेतली. त्यामुळे, सीबीआयला आता राज्यात येऊन तपास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. यावर भाजपा नेते किरीट सोमैया यांनी, सरकार स्वतःच्या गुंडगिरीची काळजी घेण्यासाठी सीबीआयला नो एन्ट्री करत आहे, अशी टीका केली.
सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला आपल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश होईल याची भीती वाटत आहे. त्यामुळे, त्यांनी महाराष्ट्रात सीबीआयला तपास करण्यासाठी परवानगी घेतल्याशिवाय येऊ नये, असा अध्यादेश काढला. हे सरकार त्यांच्या विरोधात कोणी बोलले तर त्यांना त्यांच्या घरी जाऊन मारते, पत्रकारांनी त्यांच्याविरोधात लिहिले की त्यांना पोलीस स्टेशनमध्ये टाकण्यात येते. हे सरकार स्वतःच्या गुंडगिरीची काळजी घेण्यासाठी सीबीआयला नो एन्ट्री करत आहे, अशी सोमैया यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
हेही वाचा- अजित पवार निगेटिव्ह, थकवा असल्याने झाले क्वॉरन्टाइन