ETV Bharat / state

पालिका शाळांमधील मुलांना दिलेले टॅब उपयोगाविना पडून; विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय - Education Committee Mumbai Municipal Corporation

टॅब योजना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची ड्रीम संकल्पना होती. 2014 पासून विद्यार्थ्यांना टॅब देण्याची योजना सुरू करण्यात आली. मात्र, या योजनेचा बोजवारा उडाला आहे. आतापर्यंत सुमारे ४० हजार टॅब इयत्ता ८ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. यातील बहुतांशी टॅब बंद असल्याने पडून आहेत. इयत्ता १० वीची परीक्षा जवळ आली असल्याने अभ्यास करताना विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

tab
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 29, 2019, 10:22 AM IST

मुंबई - पाठिवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले होते. मात्र, त्यापैकी बहुतांशी टॅब बंद पडले आहेत. दहावीची परीक्षा जवळ आली असताना टॅबचा उपयोगच होत नसल्याची धक्कादायक माहिती शिक्षण समिती समोर आली. येत्या ९ जानेवारीला होणाऱ्या विशेष सभेत याबाबत माहिती देण्याचे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत.

शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक

टॅब योजना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची ड्रीम संकल्पना होती. 2014 पासून विद्यार्थ्यांना टॅब देण्याची योजना सुरू करण्यात आली. मात्र, या योजनेचा बोजवारा उडाला आहे. आतापर्यंत सुमारे ४० हजार टॅब इयत्ता ८ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. यातील बहुतांशी टॅब बंद असल्याने पडून आहेत. काही टॅबमध्ये एसडी कार्ड नसल्याने त्याचा उपयोग होत नाही. इयत्ता १० वीची परीक्षा जवळ आली असल्याने अभ्यास करताना विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शैक्षणिक वर्ष संपत आले असताना या टॅबच्या दुरुस्तीसाठी नवे कंत्राट दिले जाणार आहेत, असा खुलासा करत राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी शिक्षण समितीत हरकतीचा मुद्दा मांडून ही वस्तूस्थिती समोर आणली.

हेही वाचा - मुंबई पालिकाही एक्सिस बँकेतील खाती बंद करणार - महापौर किशोरी पेडणेकर

पालिका शाळांमध्ये देण्यात आलेल्या टॅबची संख्या, त्यापैकी किती बंद आहेत, किती वापरात आहेत याची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक साईनाथ दुर्गे यांनी केली आहे. टॅब देण्याचा उद्देश सफल होत नसेल तर हा उपक्रम राबवून उपयोग काय, असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, टॅबची सद्यस्थिती काय आहे, याबाबत प्रशासनाला उत्तर देता न आल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे. येत्या ९ जानेवारीला होणाऱ्या विशेष बैठकीत प्रशासनाने टॅब बाबतच्या सद्यस्थितीचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Intro:मुंबई - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तर कमी करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून टॅब देण्यात आले. मात्र त्यापैकी बहुतेक टॅब बंद पडले आहेत. १० वीची परीक्षा जवळ आली असतानाही टॅबचा उपयोगच होत नसल्याची धक्कादायक माहिती शिक्षण समितीत समोर आली. येत्या ९ जानेवारीला होणा-या विशेष सभेत याबाबत माहिती देण्याचे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी प्रशासनाला दिले.Body:टॅब योजना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची ड्रीम संकल्पना आहे. पहिल्या वर्षी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांपासून टॅब देण्याची योजना सुरु करण्यात आली. मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्याचा उद्देश य़ा योजनेमागे आहे. मात्र या योजनेचा बोजवारा उडाला आहे. सुमारे ४० हजार टॅब इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले. मात्र यातील बहुतांशी टॅब सद्या बंद असल्याने पडून आहेत. काही टॅबमध्ये एसडी कार्ड नसल्याने त्याचा उपयोग होत नसल्याने हे टॅबही वापराविना आहेत. इयत्ता १० वीची परीक्षा जवळ आली असतानाही विद्यार्थ्यांना टॅब नसल्याने अभ्यास करताना विद्यार्थ्यांची गैरसोय होते आहे. शैक्षणिक वर्ष संपत आले असताना या टॅबच्या  दुरुस्तीसाठी नवे कंत्राट दिले जाणार आहे असे सांगत राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी शिक्षण समितीत हरकतीचा मुद्दा मांडून याबाबतची वस्तूस्थिती समोर आणली.

पालिका शाळांत देण्यात आलेल्या टॅबची संख्या, किती बंद झाले, किती वापरात आहेत आदी माहिती प्रशासनाने द्यावी अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक साईनाथ दुर्गे यांनी केली. मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी टॅब दिले जातात. मात्र अभ्यासाठी मुलांना त्याचा वापर होतच नसेल तर ते गंभीर आहे, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. टॅब देण्याचा उद्देश सफल होत नसेल तर हा उपक्रम राबवून उपयोग काय असा सवाल नगरसेवकांनी विचारला. दरम्यान, टॅबची सद्यस्थिती काय आहे, याबाबत प्रशासनाला उत्तर देता न आल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. टॅब योजनेत काही तरी गोंधळ आहे, याबाबत नगसेवकांनी संशय व्यक्त केला. दरम्यान, येत्या ९ जानेवारीला होणा-या विशेष बैठकीत प्रशासनाने टॅब बाबतच्या सद्यस्थितीचा सविस्तर अहवाल सादर करावा असे निर्देश शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी प्रशासनाला दिले.

शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांची बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.