मुंबई : राज्याचे एसटी महामंडळ (ST Corporation) तोट्यात असताना एसटी महामंडळाला भरघोस कमाईची संधी आहे. तरी देखील एसटी महामंडळ प्रवाशांची सोय न पाहता किंवा त्यांच्या मनात विचार येईल त्या पद्धतीने अंमल करण्याचा प्रयत्न करत आहे. (Express Highway) यामुळे उत्पन्न कसे वाढणार हा प्रश्न नवीन आदेशामुळे उपस्थित होतो. (Mumbai Pune Highway) काल नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एस टी महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक यांनी हा आदेश जारी केलेला होता. (Shivshahi Bus Mumbai)
बचतीमुळे एसटी महामंडळ फायद्यात : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, हुबळी, बंगलोर, मंगलोर सर्व गाड्या जुन्या मार्गे गेल्या पाहिजे असे प्रशासनाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. जुन्या मुंबई पुणे हायवे परतीच्या प्रवासासाठीसाठी एका बसला रुपये 485 रुपये टोल द्यावा लागतो. तर नवीन एक्सप्रेस वे ना जाण्यासाठी त्याच बसला रुपये 675 टोल जाऊन येऊन द्यावा लागतो. एका बसमागे एका फेरीला 190 रुपये वाचतात. ह्या बचतीमुळे एसटी महामंडळ फायद्यात येईल, असे महामंडळाचे म्हणणे आहे. असे नाव न सांगण्याच्या अटीवर काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
या कारणामुळे घेतला निर्णय : लोणावळ्याला शनिवार- रविवार मोठ्या संख्येने प्रवासी व पर्यटक जात असतात. शिवाय इतर दिवशी ही मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक प्रवास करत असतात. मात्र परस्पर एक्सप्रेस हायवेने पसार होणाऱ्या एसटीच्या बसेसमुळे प्रवाशांना जादा पैसे देऊन खाजगी वाहनांनी जावे लागते. यातून मार्ग काढण्याच्या उद्देशाने प्रशासनाने तसा निर्णय घेतला असल्याचे कालच्या आदेशात म्हटले आहे.
उपमहाव्यवस्थापकाचे स्पष्टीकरण : आज मात्र महामंडळ उपमहाव्यवस्थापक यांनी आज सायंकाळी जारी केलेल्या नमूद केले आहे की ,"प्रसार माध्यमातील बातम्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होऊ शकतो. म्हणून शिवशाही आणि शिवनेरीसह मुंबई ते सातारा आणि बोरिवली ते साताराकडे जाणाऱ्या एसटी बस ह्या एक्सप्रेस जलदगती मार्गावरून जातील."