ETV Bharat / state

स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न आता संपला - विजय औटी - स्वतंत्र विदर्भा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षाचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न आता संपला आहे.

स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न आता संपला आहे - विजय औटी
author img

By

Published : Jul 3, 2019, 8:36 PM IST

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा 5 वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न आता संपला आहे. विदर्भातील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना पाच वर्षांचे मुख्यमंत्रीपद मिळाले होते. त्यानंतर आता फक्त देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची 5 वर्षे पूर्ण केली आहेत. हे महाराष्ट्राचे भाग्य आहे, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कधीच विभाजन होऊ देणार नाहीत, अशा शब्दात विधानसभा उपाध्यक्ष विजय औटींनी विधानसभेतील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

यावेळी औटी म्हणाले, स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न आता संपला आहे. उपाध्यक्षपदासाठी कमी कालावधी मिळाला तरी कमी कालावधीत किती लोकांना न्याय दिला हे महत्त्वाचे आहे. कोणाला न्याय दिला नाही, तर कोणावर अन्याय होऊ दिला नाही, ही भावना लोकशाहीच्या पवित्र सभागृहात बसून काम करताना ठेवली.

विधानसभेत औटींचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, औटींना तसा कमी कालावधी मिळाला. कमी कालावधीत त्यांनी चांगले काम केले. अभ्यासूपणा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आईवडील कट्टर कम्युनिस्ट असूनही कॉंग्रेस- समाजवादी असा प्रवास करुन औटी शिवसेनेत आले. पारनेर तालुक्यातील वीज, सिंचन, रस्त्याचे काम करुन लोकांचा औटी यांनी लोकांचा विश्वास मिळवला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

Intro:Body:MH_MUM_Vijay_Auti_Nirop__Vidhansabha_7204684

मुख्यमंत्री...! स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न आता संपला
- विधानसभा उपाध्यक्ष विजय औटींचा टोला

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केला.त्यामुळं स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न आता संपला आहे. विदर्भातलेच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना पाच वर्षाचं मुख्यमंत्रीपद मिळालं. त्यानंतर आता फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं तेही विदर्भातले आहेत हे महाराष्ट्राचं भाग्य आहे, महाराष्ट्राचं कधीच विभाजन कदापी होऊ देणार नाही ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची घोषणा लोकशाही आणि नियतीच्या संकेतांनं आपण अनुभवत आहोत, उघड्या डोळ्यानं अनुभवत आहोत, अशा शब्दात
उपाध्यक्ष विजय औटींनी विधानसभेतील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी आपल्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
विधानसभेत औटींचं अभिनंदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
उपाध्यक्ष विजय औटींना तसा कमी कालावधी मिळाला. कमी कालावधीत त्यांनी चांगलं काम केले.अभ्यासूपणा त्यांच वैशिष्ट्य होतं. ते यापूर्वी तालिका अध्यक्ष म्हणुन काम करत होतेच. पारनेर मतदारसंघाचं रोखठोक भुमिका घेऊन काम करतात. स्पष्टोक्ती ठेऊन काम करतात. आईवडील कट्टर कम्युनिस्ट असूनही कॉंग्रेस- समाजवादी असा प्रवास करुन औटी शिवसेनेत आले. काही काळ राजकारणात अलिप्त राहून ते २००४ पासून आतापर्यंत आमदार आहे. पारनेर तालुक्यातील स्वातंत्र्यपुर्व कालावधी पासूनचे वीज,सिंचन, रस्त्याचं काम करुन लोकांचा विश्वास मिळवला, असं मुख्यमंत्री म्हणाले.

उत्तरात विजय औटी म्हणाले,
उपाध्यक्षपदासाठी कमी कालावधी मिळाला तरी कमी कालावधीत किती लोकांना न्याय दिला हे महत्वाचे आहे. कोणाला न्याय दिला नाही तर कोणावर अन्याय होऊ दिला ही भावना ठेवून लोकशाहीच्या पवित्र सभागृहाच्या परमोच्च स्थानावर बसून काम करताना ठेवली. अध्यक्ष बागडेंनी मला कधी मज्जाव आणि सूचना केली नाही.

राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केल्याचं सांगत औटी म्हणाले, त्यामुळं आता स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न आता संपला आहे. विदर्भातले वसंतराव नाईक यांना पाच वर्षाचं मुख्यमंत्रीपद मिळालं. त्यानंतर फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं तेही विदर्भातले. हे महाराष्ट्राचं भाग्य आहे, महाराष्ट्राचं कधीच विभाजन कदापी होऊ देणार नाही हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची घोषणा लोकशाही आणि नियतीच्या संकेतांनं आपण अनुभवत आहोत, उघड्या डोळ्यानं अनुभवत आहोत.
उपाध्यक्षपदाच्या कामाच्या आठवणींना उजाळा देताना औटी म्हणाले,
मी उपाध्यक्ष झाल्यावर लक्षात आलं ३ हजार कपात सुचनांवर उत्तरं दिली. आज फक्त ३० कपात सूचनांची उत्तरं शिल्लक आहेत.मुजोर सचिवांना तंबी देऊन कामाला लावले. विधानमंडळाला गृहीत करण्याचा मंत्रालय स्तरावरुन प्रयत्न आपण हाणुन पाडू आणि सगळे पुन्हा निवडून येऊ, असंही विजय औटी शेवटी म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.