मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. येत्या 12 तासात त्याचे 'निसर्ग' चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. हे ‘निसर्ग’ चक्रीवादळ हरिहरेश्वर आणि दमणच्या दरम्यान अलिबागच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ञ शुभांगी भुत्ते यांनी वेधशाळेच्या सुधारीत अंदाजानुसार दिली आहे.
पुढील 12 तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढून ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर-पूर्व दिशेने पूर्वेकडे जाऊन हरीहरेश्वर ते दमण दरम्यान अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. या वादळाचा वेग जास्तीत जास्त 110 ते 120 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे. या दरम्यान हवामान बदलामुळे ठाणे, पालघर, रायगड, मुंबई या परिसरामध्ये मुसळधार ते अतिमूसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.