ETV Bharat / state

Stamp paper scam : स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी तेलगीवरील वेब सीरिजवर 16 फेब्रुवारी रोजी सुनावणी

संपूर्ण देशभरात गाजलेला तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर वेब सिरीजवरील प्रदर्शनापूर्वी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारे याचिका तेलगीचच्या मुलीने मुंबई दिवाणी न्यायालयात केली होती. या याचिकेवर निर्माता तेलगीच्या मुलीच्या वतीने उत्तर दाखल करण्यात आले. या याचिकेवर पुढील सुनावणी 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात यावी या संदर्भातील अर्ज येता दोन आठवड्यात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तेलगीचे वकील माधव थोरात यांनी दिली आहे.

Stamp paper scam
स्टॅम्प पेपर घोटाळा
author img

By

Published : Jan 28, 2023, 10:00 AM IST

Updated : Jan 28, 2023, 11:55 AM IST

मुंबई : स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील मुख्य आरोपी तेलगी स्वर सोनी चैनलच्या वतीने वेब सिरीज तयार करण्यात येत आहे. तेलगीच्या मुलीची या वेब सिरीजवर तात्पुरती बंदी आणावी याकरिता केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. न्यायाधीश आर के काहिरसागर यांनी निर्णय दिला होता. त्यानंतर या याचिकेवर सविस्तर सुनावणी घेण्यात येणार. पूर्वी दोन्हीही पक्षकारांना सविस्तर उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून उत्तर दाखल करण्यात आले असून आता 16 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

मागणी फेटाळून लावली : तेलगी यांच्या मुलीने दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, ज्या पुस्तकाच्या आधारे वर वेब सिरीज बनत आहे. त्या पुस्तकावरील अनेक माहिती चुकीची आहे. जर ही वेब सिरीज प्रदर्शित झाली तर कुटुंब यांची मोठी बदनामी होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत या याचिकेवर पूर्ण सुनावणी होत नाही तोपर्यंत बंदी घालण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे प्रतिवाद्यांना या वेब सिरीजवर जाहिरात आणि इतर कोणत्याही कामावर बंदी घालण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

वेब सिरीज प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भवऱ्यात : बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील दोषी अब्दुल करीम तेलगीची मुलगी सना इरफान तालिकोटी हिने त्याच्या जीवनावर आधारित वेब सीरिजच्या निर्मात्यांविरुद्ध शहर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. स्टॅम्प पेपर घोटाळा 2003 मधील मुख्य दोषी आरोपी अब्दुल करीम लाला यांच्या संबंधित येणाऱ्या वेब सिरीज प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. या वेब सिरीजच्या प्रदर्शनापूर्वी मुख्य आरोपी तेलगीच्या कुटुंबीयांची परवानगी घेण्यात आली नाही. असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे या वेब सिरीजला प्रदर्शित करण्यापासून थांबवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रमुख प्रकरणातील आरोपी तेलगीच्या कुटुंबीयांनी मुंबई शहर दिवाणी न्यायालयात अ‍ॅपलॉज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक हंसल मेहता, सरव्यवस्थापक प्रसून गर्ग आणि सोनी लिव्ह यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली आहे.

प्रतिष्ठेचे नुकसान होईल : सना इरफान तालिकोटी आरोप केला आहे की, कादंबरीवर आधारित आमच्या वडिलांच्या व्यक्तिरेखेचे ​​चित्रण खोटे, निराधार, अपमानास्पद, आक्षेपार्ह, अप्रिय, अत्यंत बदनामीकारक आहे. आमची, आमच्या कुटुंबाची आणि आमच्या मृत वडिलांची बदनामी करण्याच्या उद्देशाने केले गेले आहे. त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल असे म्हटले आहे. याचिककर्ती सना इरफान तालिकोटी पुढे म्हणाली की, वेब सीरिजमुळे तिच्या अल्पवयीन मुलांचेही नुकसान होईल. तिने सांगितले की तिच्या वडिलांनी अनेक सामाजिक कारणांसाठी बराच वेळ, पैसा खर्च केला होता. पाण्याच्या टाक्या, बोअरवेल, मंदिरे आणि मशिदी बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. त्यांनी अनेक गरीब मुलांचे शैक्षणिक कर्ज देखील केले होते असे म्हटले आहे.

2001 ला बेंगळुरू येथे अटक : स्टॅम्प पेपर घोटाळ्या मधील भूमिकेसाठी 30 वर्षांची शिक्षा भोगत असताना 56 वर्षीय तेलगीचा ऑक्टोबर 2017 मध्ये बेंगळुरूच्या रुग्णालयात मृत्यू झाला. 1993 ते 2002 दरम्यान त्याने नाशिकमधील सरकारी सुरक्षा मुद्रणालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बनावट स्टॅम्प पेपर छापण्यासाठी सरकारी लिलावात मशिनरी खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने बँका, विमा आणि स्टॉक ब्रोकरेज फर्म्स यांसारख्या मोठ्या खरेदीदारांना सवलतीत विकले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी तेलगीला 22 नोव्हेंबर 2001 रोजी बेंगळुरू येथे अटक करण्यात आली होती.

नेते छगन भुजबळ यांचे देखील नाव : तेलगीच्या अटकेनंतर शेकडो कोटी रुपयांचा हा घोटाळा उघड झाला. त्यानंतरच्या तपासात त्याचे अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे उघड झाले होते. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे देखील नाव तेलगी सोबत त्यावेळी जोडले गेले होते. महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये तेलगीवर सुमारे 48 गुन्हे दाखल आहे. ज्यात पुण्यातील बंड गार्डन पोलिस स्टेशनमधील सर्वात हायप्रोफाइल प्रकरणाचा समावेश होता. ज्यामध्ये पोलिसांनी 500 कोटींचे स्टॅम्प पेपर जप्त केले होते. सीबीआयने नंतर सर्व प्रकरणे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत विशेष मकोका कोर्टात एकत्र केली होते.

याचिकेवर लवकर सुनावणी : तेलगीच्या मुलीचे वकील माधव थोरात यांनी म्हटले की, या याचिकेवर तातडीने सलोनी घेण्यात यावी अशी मागणी करणारे अर्ज आम्ही लवकरच न्यायालयासमोर देणार आहे. सोनी टीव्हीच्या ऑनलाइन वेबसाईटवर या संदर्भातील वेबसाईट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अशा संदर्भातील जाहिरात करण्यात येत आहे. त्यामुळे वेब सिरीज प्रदर्शित करण्यात येणाऱ्या जाहिरातीवर बंदी आणि या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी. अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात देण्यात येणार आहे. असे माधव थोरात यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Stamp paper scam स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील मुख्य आरोपी तेलगीच्या घोटाळ्यावर वेबसीरिजविरोधात याचिका दाखल

Last Updated : Jan 28, 2023, 11:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.