ETV Bharat / state

तिसऱ्या लाटेचा बालक व झोपडपट्टांना धोका लढण्यासाठी पालिका सज्ज - मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बालरोग तज्ञांना प्रशिक्षण

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पश्चिम उपनगरे, सुरेश काकाणी यांनी सर्व परिमंडळ उपायुक्‍त, सर्व २४ प्रशासकीय विभागांचे सहाय्यक आयुक्त आणि आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी यांना कार्यवाही व अंमलबजावणीबाबत निर्देश दिले आहेत.

बालक व झोपडपट्टांना धोका
बालक व झोपडपट्टांना धोका
author img

By

Published : Jun 1, 2021, 1:05 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात पालिकेला यश येत आहे. कोरोनाचे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यात लहान मुलांना व झोपडपट्टी परिसरांमधील रहिवाश्यांना संसर्गाची अधिक शक्यता असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने सज्ज व सतर्क राहण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले

बालरोग तज्ञांना प्रशिक्षण

बालक व झोपडपट्टांना धोका
बालक व झोपडपट्टांना धोका

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पश्चिम उपनगरे, सुरेश काकाणी यांनी सर्व परिमंडळ उपायुक्‍त, सर्व २४ प्रशासकीय विभागांचे सहाय्यक आयुक्त आणि आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी यांना कार्यवाही व अंमलबजावणीबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रातील बालरोग तज्ञांना विशेष प्रशिक्षण देण्याच्या‌ दृष्टीने कार्यवाही करावी, व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करावे. हे प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्ष पद्धतीने आयोजित करावेत. सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन व तुकड्या करण्यात याव्यात. अशा प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील संबंधित विभागातील ज्येष्ठ तज्ञ मंडळी मार्गदर्शन करतील. यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्याची जबाबदारी महानगरपालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर 'पेडियाट्रिक टास्क फोर्स' मधील सदस्यांनाही मार्गदर्शक म्हणून या प्रशिक्षण कार्यक्रमांना निमंत्रित करण्यात यावे.

कृती आराखडा बनवावा

या व्यतिरिक्त महानगरपालिकेच्या सर्व 'हेल्थ पोस्ट' च्या स्तरावर गृहभेटी वाढविण्यात याव्यात. तसेच सर्व झोपडपट्टी परिसर, सार्वजनिक शौचालये आणि सार्वजनिक सुविधा इत्यादींच्या ठिकाणी अधिक प्रभावी स्वच्छता राखण्यात यावी. या सर्व बाबतीत संनियंत्रण व पुनर्विलोकन हे परिमंडळ उपायुक्तांच्या स्तरावर करण्यात यावे. या सर्व बाबींसंदर्भात प्रशासकीय विभागांच्या स्तरावर कृती आराखडा तयार करून तो कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात यावा.

हेही वाचा-ऊसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाचा कोरोनाने मृत्यू; राहुलचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.