ETV Bharat / state

Samrudhi Mahamarg:समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी पहिला टप्पा पूर्ण मुख्यमंत्री घेणार आढावा - Balasaheb Thackeray Samrudhi Mahamarg

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या (Balasaheb Thackeray Prosperity Highway) नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले (The first phase of Samrudhi Highway from Nagpur to Shirdi has been completed ) आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) या कामाचा आढावा घेणार असून वर्षा निवासस्थानी या संदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पहिला टप्पा खुला करण्यावर आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Samrudhi Mahamarg
समृद्धी महामार्ग
author img

By

Published : Apr 1, 2022, 2:56 PM IST

मुंबई: नागपूर ते मुंबई, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यापैकी शिर्डी ते नागपूर हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. मात्र रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करायच्या सोयी सुविधा आणि एक्झिट पॉईंट उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या कामांचा आज मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. दरम्यान लवकरच पहिला टप्पा वाहनांकरीता खुला केला जाणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आढावा बैठकीनंतर याबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित राहणार आहे.

समृद्धी महामार्गाचा काही भाग अरण्यातून जातो आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या रक्षणासाठी आठ ओव्हरपास आणि 76 ठिकाणी जमीनीखालून मार्ग ठेवले आहेत. वन्यजीवांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी नॉईस बेरियर्स देखील बसवण्यात येणार आहेत. वन्यजीवांना ओव्हर पासवरून ये - जा करताना जंगल असल्याचा भास व्हावा, याकरीता खास झाडे लावण्यात आली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.