ETV Bharat / state

सप्टेंबर महिन्यात होणार अंतिम परीक्षा; युजीसीच्या नवीन मार्गदर्शक सूचना जारी - केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोग बातमी

केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) पदवी अंतिम वर्षाची किंवा सत्राची परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात यावी, असे सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Jul 7, 2020, 12:44 AM IST

मुंबई - कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन राज्य सरकारने विद्यापीठ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या अंतिम वर्षांच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्या निर्णयाला आता केंद्र सरकारने खो घालत या परीक्षा घेण्याचे फर्मान काढले आहेत. त्यामुळे केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) पदवी अंतिम वर्षाची किंवा सत्राची परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात यावी, असे सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

देशातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जुलैमध्ये परीक्षा घेणे शक्य आहे का? याबाबत विचार करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने हरियाणा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू आर.सी. कुहाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने सुधारित मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. या सूचना आयोगाने सोमवारी (दि. 6 जुलै) पार पडलेल्या बैठकीत मंजूर करण्यात आल्या. या सुचनांनुसार विद्यापीठांना सप्टेंबरमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. या परीक्षा विद्यापीठांनी ऑफलाइन, ऑनलाइन किंवा दोन्ही पद्धतींचा अवलंब करुन घ्याव्यात, अशी सूचना आयोगाने केली आहे.

दरम्यान, 29 एप्रिल रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. यानुसार अंतिम वर्षाच्या व अंतिम सत्राच्या परीक्षा जुलै महिन्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अपवाद वगळून राज्यातील पारंपरिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय किंवा परीक्षा देऊन पदवी देण्याबाबचा निर्णय घेतला जाहीर केला होता. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्यासाठी सरकारकडून संबंधित अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांना विनंती करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली होती. त्यावर निर्णय येणे अपेक्षित असतानाच आज केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्वच विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याची परवानगी दिली.

कोरोनाची परिस्थिती देशात असली तरी प्रत्येक विद्यार्थ्याला समान न्याय मिळावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात जागतिक पातळीवर टीकाव धरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांच्या संपूर्ण कौशल्यांचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे, तसेच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही समान न्याय मिळावा, अशी शिफारस हरियाणा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू आर.सी. कुहाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्यामुळे युजीसीच्या या नवीन मार्गदर्शक सूचना आल्या तरी 29 एप्रिलच्या सुचना कायम राहतील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - मुंबईतील 'या' चार कोरोना आरोग्य केंद्राचे मंगळवारी मुंख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.