मुंबई : पतीने प्रसारमाध्यमात केलेल्या बदनामीकारक लिखानामुळे मुंबई उच्च न्यायालयाने घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला आहे. पती चांगली वागणुक देत नसल्याचा आरोप पत्नीने केला होता. त्याविरुद्ध पत्नीने कौटुंबिक न्यायालयात पतीविरूद्ध दाद मागीतली होती. त्यावर कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकेला अव्हान देण्यात आले होते. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे.
कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे : या खटल्यामध्ये पत्नीने आरोप केला होता की, 'पती दारूच्या नशेत असातांना नाहक त्रास देतो. तसेच चरित्र्यावर वांरवार संशय घेतो. त्यामुळे माझे मानसिक संतुलन बिघडले असुन घटस्फोट द्यावा अशी मागणी पत्नीने न्यायालयाला केली होती. त्यावर कौटुंबिक न्यायालयाने पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.
पत्नीची बदनामी करणारा लेख : जेव्हा प्रकरण कौटुंबिक न्यायालयात गेले तेव्हा पत्नीने सांगितले की, अशा क्रूर जाचातून माझी सुटका करणे हा एकमेव पर्याय आहे. त्यावर कौटुंबिक न्यायालयाने अखेर घटस्फोट मंजूर केला होता. तसेच पतीला बँकेत गहाण ठेवलेले दागिने परत करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, या निकालानंतर पतीने एका वर्तमानपत्रात पत्नीची बदनामी करणारा लेख लिहिला होता.
घटस्फोट मंजूर : त्याविरुद्ध पतीने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. याचिकेत पतीने दावा केला होता की, प्रतिवादी-पत्नीशी संबंधित कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले नाही. तिच्या कृत्यांमुळे त्याचे जीवन उद्ध्वस्त झाल्याचे त्याने सांगितले होते. परिणामी, न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर करत पत्नीला दिलासा दिला आहे. 'दोघातील कटुतेमुळे, समेट करणे शक्य नाही. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा निर्णय आम्ही कायम ठरवीत आहेत.' असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.