मुंबई - मानखुर्द पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथक सामान्य नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी नागरीकांना जागरूक करण्याचे काम पथकाकडून करण्यात आले. २०१२ पासून हे दहशतवादी विरोधी पथक मुंबईसह अन्य शहरातही नागरिकांशी संवाद साधून त्यांना जागरूक करण्याचे काम करत आहे. दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचारी राजेंद्र भताने आणि अजमुद्दीन मीर ह्यांनी मार्गदर्शन केले.
हेही वाचा - 'प्रत्येकवेळी राग आला, चीड आली म्हणून सरकारबाहेर पडणे योग्य नसते'
प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक दहशतवादी पथक कार्यरत
पाच जणांचे मिळून हे पथक बनवण्यात आले आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक दहशतवादी पथक कार्यरत असते. अगदी गुप्त पद्धतीने हे पथक काम करत असते. जागरूक नागरिकांना प्रशिक्षण देऊन यांना सोबत घेऊन हे पथक स्थानिक पातळीवर काम करतात. दर शनिवारी स्थानिक पोलीस स्टेशमध्ये या पथकाची साप्ताहिक बैठक बोलावली जाते.
नागरिक पोलिसांचे कान आणि डोळे
समाजातील मुख्य घटक असलेले जागरूक नागरिक हे पोलिसांचे कान आणि डोळे असतात. पोलिसांना समाजात घडत असलेल्या प्रत्येक घटनेबदल माहिती नसते. त्यामुळे गंभीर हालचालीसारख्या घटनांची माहिती हे जागरूक नागरिक पोलिसांना देतात. त्यामुळे समाजात काही चुकीचे घडण्याआगोदरच पोलिसांना त्या विरोधात योग्य कारवाई करता येते. नागरिकांच्या मदतीमुळेच घटना सुव्यवस्था राखता येईल, अशी माहिती राजेंद्र भताने यांनी दिली.
हेही वाचा - अक्षय कुमारला कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती