मुंबई - राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून खाडी मार्गे अवैद्य दारूच्या तस्करीवर अंकुश बसवण्यासाठी ठाणे उत्पादन शुल्क विभागाला 8 बोटी देण्यात आलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तस्करीच्या माध्यमातून परदेशी, देशी व गावठी दारु मुंबईत येत असल्यामुळे या विरोधात धडक कारवाई करण्यात येत होती. या दरम्यान ठाण्याजवळ असलेल्या खाडीमार्गे मुंब्रा , डोंबिवली सारख्या परिसरातून देशी, गावठी दारू येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आतापर्यंत 25 लाख रुपयांची दारू जप्त करत 15 जणांना अटक करण्यात आलेली आहे.
मार्च 2021 ते जून 2021 या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून 708 गुन्हे दारू तस्करीचा संदर्भात नोंदविण्यात आलेले असून 409 दारू तस्करांना अटक करण्यात आलेली आहे. यादरम्यान 2 कोटी रुपयांहून अधिकची दारू जप्त करण्यात आलेली आहे. ठाणे जवळ असलेल्या खाडीच्या मार्गातून गावठी, देशी व परदेशी दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या संदर्भात ठाण्याच्या जिल्हाधिकार्यांना पत्र लिहिण्यात आले होते. राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून याचा पाठपुरावा करण्यात आल्यानंतर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या संदर्भात स्थानिक पोलिसांच्या मदतीने राज्य उत्पादन शुल्क ने कारवाई करावी म्हणून 8 बोटी देण्यात आलेल्या आहेत.
ठाण्याच्या खाडीमार्गे दारूची तस्करी रोखण्यासाठी, राज्य उत्पादन शुल्क खात्याला मिळाल्या 8 बोटी - Thane liquor mafia news
राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून खाडी मार्गे अवैद्य दारूच्या तस्करीवर अंकुश बसवण्यासाठी ठाणे उत्पादन शुल्क विभागाला 8 बोटी देण्यात आलेल्या आहेत.