ठाणे - संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या मनसुख हिरेन प्रकरणी आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला होता त्याच ठिकाणी आणखी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. शेख सलीम अब्दुल असे त्या मृत व्यक्तीचे नाव असून पाण्यात बूडून त्याचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलीस घटनस्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गुढ अजून उकलले नसतानाच आज पुन्हा त्याच ठिकाणी दुसरा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- अँटिलिया प्रकरणात सचिन वाझेंकडून एनआयएने करून घेतले नाट्य रूपांतर