ETV Bharat / state

राज्यात आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात आजपासून होत आहे.

आजपासून दहावीची परिक्षा
author img

By

Published : Feb 28, 2019, 11:54 PM IST

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात आजपासून होत आहे. राज्यात असलेल्या २२ हजार २४४ माध्यमिक शाळांतील १७ लाख ८१३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेची नोंदणी केली असून त्यात ९ लाख २७ हजार ८२२ विद्यार्थी तर ७ लाख ७२ हजार ८४२ विद्यार्थिनी आहेत. राज्यभरात दहावीची ही परीक्षा तब्बल ८ हजार ८७४ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.

दहावीच्या या परीक्षेला मुंबई विभागीय मंडळातून ३ लाख ८३ हजार ३२० विद्यार्थी परीक्षेला बसणार असून ही परीक्षा मुंबईतील ९९९ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. यात जुन्या अभ्यासक्रमातील १६ हजार ३०७ विद्यार्थी आहेत.
राज्यात या परीक्षेच्या कालावधीत कोणतेही गैरप्रकार होऊ नये, यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळात विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून गुरुवारी देण्यात आली.

दहावीच्या परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना पेपरपूर्वी अर्धा तास परीक्षा केंद्रात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर मागील वर्षाप्रमाणे यंदाही १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हाती दिली जाणार आहे. परीक्षेच्या सर्व सूचना यावेळी विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीतून त्यांच्या हॉलतिकीटावर देण्यात आल्या आहेत, तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा यासाठी परीक्षेचे वेळापत्रक नोव्हेंबर महिन्यातच शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

undefined

दुसरीकडे या परीक्षेच्या कालावधीत पेपरच्या दरम्यान खंड ठेवण्यात आला आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात आलेले वेळापत्रक आणि परीक्षा केंद्रांत लावण्यात आलेले वेळापत्रकच विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरावे. व्हॉट्सअप अथवा इतर समाज माध्यमातून वायरल झालेले वेळापत्रक यावर विद्यार्थ्यांनी विश्‍वास ठेवू नये, अशा सूचनाही मंडळाकडून करण्यात देण्यात आल्या आहेत.

परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांना नकारात्मक विचार अथवा परीक्षेची भीती, मानसिक दडपण येते. त्यासाठी विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या ९ विभागीय मंडळात समुपदेशन करण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा. या दृष्टीने मंडळाकडून राज्यात एकूण २५२ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आल्या असून त्यासोबतच विशेष महिला भरारी पथके आणि काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. यावेळी ही परीक्षा केंद्राच्या परिसराचे व्हिडिओ चित्रीकरण आणि त्यासाठीच्या उपायोजना मंडळाकडून केल्या असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.

ही असेल अखेरची संधी -
पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही १६ लाख ४१ हजार ५६८ इतकी आहे. तर जुन्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या ५९ हजार २४५ इतकी आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची ही दहावीची परीक्षा अंतिम असणार आहे. त्यामुळे या परीक्षेला या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. अन्यथा त्यांना पुढील परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार अभ्यास करावा लागणार आहे.

undefined

मुंबईत सर्वाधिक दिव्यांग देणार परीक्षा -
मुंबई विभागीय मंडळात उद्याच्या दहावीच्या परीक्षेला तब्ब्ल २ हजार ४८३ दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देणार असून मागील वर्षांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. या विद्यार्थ्यांना २२ हून अधिक प्रकारच्या विविध सुविधा दिल्या जाणार आहेत.

Intro:उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवातBody:उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात
राज्यभरात 17 लाख 813 विद्यार्थी देणार

मुंबई, ता. 28 :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात उद्या शुक्रवारी, 1 मार्चपासून मार्चपासून होत आहे. राज्यात असलेल्या 22 हजार 244 माध्यमिक शाळातील 17 लाख 813 विद्यार्थ्यांनी या परीक्षेची नोंदणी केली असून त्यात 9 लाख 27 हजार 822 विद्यार्थी तर 7 लाख 72 हजार 842 विद्यार्थिनी आहेत. राज्यभरात दहावीची ही परीक्षा तब्बल 8 हजार 874 परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.
दहावीच्या या परीक्षेला मुंबई विभागीय मंडळातून 3 लाख 83 हजार 320 विद्यार्थी परीक्षेला बसणार असून ही परीक्षा मुंबईतील 999 परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. यात जुन्या अभ्यास्रक्रमातील 16 हजार 307 विद्यार्थी आहेत.
राज्यात या परीक्षेच्या कालावधीत कोणतेही गैरप्रकार होऊ नये, यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळात विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आले असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून आज देण्यात आली.
दहावीच्या परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना पेपरपूर्वी अर्धा तास परीक्षा केंद्रात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर मागील वर्षाप्रमाणे यंदाही दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हाती दिली जाणार आहे. परीक्षेसाठीच्या सर्व सूचना यावेळी विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीतून त्यांच्या हॉल तिकीटावर देण्यात आल्या आहेत तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा यासाठी परीक्षेचे वेळापत्रक नोव्हेंबर महिन्यातच शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे या परीक्षेच्या कालावधीत पेपरच्या दरम्यान खंड ठेवण्यात आला आहे. तर मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक आणि परीक्षा केंद्रात लावण्यात आलेले वेळापत्रकच विद्यार्थ्याने ग्राह्य धरावे, व्हाट्सअप अथवा इतर समाज माध्यमातून वायरल झालेले वेळापत्रक यावर विद्यार्थ्याने विश्‍वास ठेवू नये, अशा सूचनाही आज मंडळाकडून करण्यात देण्यात आल्या आहेत.

परीक्षेच्या कालावधीत कालावधीत अनेक विद्यार्थ्यांना नकारात्मक विचार अथवा भीती मानसिक दडपण येते त्यासाठी विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळात समुपदेशन करण्यासाठी दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळाकडून राज्यात मंडळाकडून राज्यात एकूण 252 भरारी पथके नेमण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आल्या असून त्यासोबतच विशेष महिला भरारी पथके आणि काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आले आहेत. तर यावेळी ही परीक्षा केंद्राच्या परिसराचे व्हिडिओ चित्रीकरण आणि त्यासाठीच्या उपायोजना मंडळाकडून केल्या असल्याची माहिती आज मंडळाकडून देण्यात आली.
---
ही असेल अखेरची संधी..
पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 16 लाख 41 हजार 568 इतकी आहे तर जुन्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या 59 हजार 245 इतकी आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ही दहावीची परीक्षा अंतिम असणार आहे. त्यामुळे या परीक्षेला या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे अन्यथा त्यांना पुढील परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार अभ्यास करावा लागणार आहे.

मुंबईत सर्वाधिक दिव्यांग देणार परीक्षा
मुंबई विभागीय मंडळात उद्याच्या दहावीच्या परीक्षेला तब्ब्ल 2 हजार 483 दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देणार असून मागील वर्षांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. या विद्यार्थ्यांना 22 हून अधिक प्रकारच्या विविध सुविधा दिल्या जाणार आहेत.Conclusion:उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.