ETV Bharat / state

KCR Rally In Sambhaji Nagar : केसीआर यांची एंट्री महाराष्ट्रातील राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा? - केसीआर छत्रपती संभाजीनगर सभा

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज औरंगाबाद येथे जोरदार सभा घेतली. या सभेत त्यांनी कोणत्याही जातीयवादी अथवा धार्मिक मुद्द्यांना हात न घालता मोफत वीज आणि पाणी अशा जनतेच्या प्रश्नांवरच बोलणे पसंत केले. त्यामुळे जर आगामी काळात पाणी, वीज आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी योग्य पावले उचलली नाही तर त्यांच्यासाठी बीआरएस पक्ष हा धोक्याची घंटा असल्याचे राजकीय विश्लेशकांनी म्हटले आहे.

KCR
के. चंद्रशेखर राव
author img

By

Published : Apr 24, 2023, 10:31 PM IST

विवेक भावसार

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (BRS) नेते के. चंद्रशेखर राव यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत स्थानिक जनतेच्या पाणी प्रश्नाला हात घालत शेतकऱ्यांना वीज व पाणी मोफत देण्यासंदर्भात विषय मांडला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण्यांनी या प्रश्नांसंदर्भात जर वेळीच पावले उचलली नाहीत तर ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते, असे विश्लेषण राजकीय जाणकारांनी केले आहे.

अनेक नेत्यांचा बीआरएस मध्ये प्रवेश : भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस या पक्षाचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे जोरदार सभा घेतली. 'अबकी बार किसान सरकार' असे ब्रीद घेऊन मैदानात उतरलेल्या केसीआर यांच्या सभेला जोरदार प्रतिसाद मिळाला. तसेच महाराष्ट्रातील राजकीय पक्षाच्या काही नेत्यांनी केसीआर यांच्या पक्षामध्ये आज जाहीरपणे प्रवेश केला.

केसीआर यांनी घातला सर्वसामान्यांच्या प्रश्नांना हात : के. चंद्रशेखर राव यांनी आज झालेल्या सभेत कोणत्याही जातीयवादी अथवा धार्मिक मुद्द्यांना हात न घालता थेट जनतेच्या प्रश्नांवरच बोलणे पसंत केले. मराठवाड्यामध्ये अतिशय गंभीर असलेला पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून कसा सुटलेला नाही आणि महाराष्ट्रातील राजकारण्यांना त्याबाबत काहीही सोयर सुतक नाही, जनतेच्या पाणी प्रश्नांवर जे नेते काम करत नाहीत ते नेते कसले, असा सवाल त्यांनी केला. जनतेची तहान भागवणे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील अनेक नद्या ह्या दुथडी भरून वाहत असतात, मात्र तरीही इथली जनता तहानलेली आहे हे इथल्या राजकारण्यांचे अपयश आहे, असे त्यांनी ठणकावले. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शेतकरी आत्महत्या सातत्याने होत आहेत. शेतकऱ्यांच्या शेती पंपाला वीज आणि शेतात पाणी मिळत नाही, त्यामुळे ते आपल्या शेतात योग्य उत्पादन घेऊ शकत नाहीत. याला सरकारची चुकलेली धोरणे कारणीभूत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

'अबकी बार किसान सरकार' : केसीआर यांनी शेतकऱ्यांना आपल्या भाषणाच्या केंद्रस्थानी ठेवले होते. शेतकऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकार उदासीन असून शेतकरी प्रश्नाला प्राधान्य दिले पाहिजे, त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांचे राज्य येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा विकास होणार नाही आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळणार नाही, असे ते म्हणाले. तेलंगणामध्ये आम्ही शेतकऱ्यांकडून वीज बिल आणि पाणीपट्टी घेत नाही, मग महाराष्ट्रासारखे राज्य हे का करू शकत नाही? जर तुम्ही बीआरएस पक्षाला निवडून दिले तर आपण नक्कीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करू आणि महाराष्ट्रातील जनतेला वीज बिल आणि पाणीपट्टी माफ करू, असे त्यांनी म्हटले आहे. जर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना वीज आणि पाणीपट्टी माफ केली तर आपण महाराष्ट्रात फिरकणार ही नाही, असे आव्हानही त्यांनी दिले.

महाराष्ट्रातील राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा? : या संदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी सांगितले की, एमआयएम नंतर आता बीआरएस हा पक्ष मराठवाड्यामध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. नांदेडमध्ये आणि मराठवाड्यात एमआयएम ने यापूर्वी जोरदार मुसंडी मारली होती, मात्र एमआयएमने धार्मिक आणि जातीय राजकारण केल्यामुळे त्यांची काही अंशी पिछेहाट झाली आहे. मात्र सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता बीआरएस पक्षाला मराठवाड्यामध्ये प्रतिसाद मिळू शकतो. जर त्यांनी वीज पाणी आणि शेतकरी यांनाच केंद्रस्थानी ठेवले तर त्यांना चांगल्या पद्धतीने यश मिळू शकते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो किंवा येणाऱ्या विधानसभांच्या निवडणुका असो, मराठवाड्यामध्ये काही जागा निश्चितच बीआरएस पक्षाला मिळू शकतील असे त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून वाटते. त्यामुळे जर आगामी काळात पाणी वीज आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी योग्य पावले उचलली नाही तर त्यांच्यासाठी बीआरएस पक्ष हा धोक्याची घंटा असल्याचे भावसार म्हणाले.

हेही वाचा : KCR in Sambhajinagar :...तर मी महाराष्ट्रात परत येणार नाही; केसीआर यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला, केंद्र सरकारही टार्गेटवर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.