ETV Bharat / state

Mumbai Crime: चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ, प्ले ग्रुपमध्ये शिक्षिका करायच्या लहानग्यांचा छळ

कांदिवलीत प्ले ग्रुपमध्ये येणाऱ्या चिमुकल्यांना मारहाण करणे, उचलून आपटणे, डोक्यात मारणे आणि हाताला धरून फरफटत नेणे असे शारीरिक छळ शिक्षकांकडून सुरू होते. हा सर्व विचित्र प्रकार प्ले ग्रुप मधील सीसीटीव्हीमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात दोन शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Crime
प्ले ग्रुपमध्ये शिक्षिका करायच्या लहानग्यांचा छळ
author img

By

Published : Apr 4, 2023, 1:10 PM IST

Updated : Apr 5, 2023, 2:15 PM IST

चिमुकल्यांना उचलून आपटणे, डोक्यात मारणे आणि हाताला धरून फरफटत नेणे

मुंबई : कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या एका पालकाने त्यांच्या दोन वर्षीय मुलास एमजी रोडवरील रायम्स अँड रंबल या प्ले ग्रुपमध्ये प्रवेश घेतला होता. जिनल छेडा, मेघना जोशी आणि विराज उपाध्याय यांनी सप्टेंबर 2012 मध्ये हा प्ले ग्रुप सुरू केला होता. आरोपी असलेली जीनल छेडा आणि तिची सहशिक्षिका भक्ती शहा या प्ले ग्रुपमध्ये काम करत होत्या. तक्रारदार पालकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा सप्टेंबरपासून या प्ले ग्रुपमध्ये जात होता. मात्र काही दिवसांपासून चिडचिड करू लागला होता. घरातील लोकांना मारण्यासाठी धावायचा. त्यामुळे पालकांना त्याच्या स्वभावात अचानक बदल झालेला दिसून आला.

दोन शिक्षकांना नोटीस बजावली : याबाबत तक्रारदार पालकांनी प्ले ग्रुपचे संचालक मेघना जोशी आणि उपाध्याय यांना माहिती दिली. त्यावर वर्गातील एखादा मुलगा चुकीची अ‍ॅक्टिव्हिटी करत असेल त्यामुळे मुले चिडचिड करतात असे त्यांना थातूरमातूर उत्तर दिले. कांदिवली पोलीस ठाण्यात दोन्ही शिक्षकांच्या विरोधात बाल न्याय अधिनियम 2000चे कलम 23 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दीपशिखा वारे या घटनेबाबत गुन्हा दाखल असल्यास दुजोरा दिला आहे. तसेच दोन शिक्षकांना नोटीस बजावली असल्याचे वारे यांनी सांगितले आहे.

सीसीटीव्हीमध्ये समजला प्रकार : वर्गातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तेव्हा शिक्षकांचे कृत्य पाहून पालकांना आश्चर्याचा धक्काच बसला. एक जानेवारी 2023 ते 27 मार्च 2023 या तीन महिन्यांच्या फुटेजमध्ये शिक्षिका जिनल छेडा आणि भक्ती शहा या मुलांना मारहाण करतानाचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे दिसले. एवढ्यावरच न थांबता या दोन्ही शिक्षिकांनी मुलांना हाताला धरून फरफटत नेण्याचे, गालावर चिमटे काढण्याचे आणि डोक्यात पुस्तक मारण्याचे प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. या प्ले ग्रुपमध्ये 28 मुलांनी ॲडमिशन घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. तर प्ले ग्रुपवर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

हेही वाचा: Mumbai Crime मुंबईतील बलात्कार प्रकरणाचे आसाम कनेक्शन 5 वर्षापासून फरार आरोपीला अखेर अटक

Last Updated : Apr 5, 2023, 2:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.