मुंबई : शिक्षक पदासाठी ‘टीईटी’ बंधनकारक असल्याने राज्यातील लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. कोरोनामुळे २०१९ पासून परीक्षेचे नियोजन राज्य परीक्षा परिषदेला करता आले नव्हते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर २१ नोव्हेंबर २०२१ला परीक्षा घेण्यात आली. मात्र, परीक्षेच्या निकालाआधीच २०१८ मध्ये झालेल्या ‘टीईटी’ परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला. त्यात गैरप्रकार केलेल्या सात हजार ८७४ परीक्षार्थींची नावे राज्याच्या परीक्षा परिषदेने जाहीर केली. याच कारणामुळे नोव्हेंबर २०२१मध्ये झालेल्या परीक्षेची निकाल प्रक्रिया लांबली होती.
परीक्षेतील गोंधळ टाळण्यासाठी प्रशासन सतर्क : शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एकसाठी मागील खेपेस दोन लाख ५४ हजार ४२८ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. यामधून दोन लाख १६ हजार ५७९ परीक्षार्थीं परीक्षेला बसले होते. यापैकी फक्त 9 हजार ६५३ विद्यार्थी पात्र होऊ शकले. टीईटी परीक्षेच्या पेपर दोनसाठी दोन लाख १४ हजार २५१ परीक्षार्थींनी अर्ज भरले होते. मात्र एक लाख ८५ हजार ४३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामधून केवळ सात हजार ६३४ विद्यार्थी पात्र ठरले होते. मागील वर्षी परीक्षेमध्ये ज्या अडचणी आणि जो गोंधळ झाला होता. तो यावर्षी येणार नाही, अशी दक्षता प्रशासनाने घेतलेली आहे.
68,000 शिक्षकांची गरज : यंदा परीक्षेसाठी राज्यभरातून सर्व जिल्हे मिळून दोन लाख 57 हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. या परीक्षेमुळे त्यांचा नोकरी मिळण्याचा शिक्षक होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जे शिक्षणसेवक आहे त्यांनी देखील ही शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केले तर त्यांना शिक्षक म्हणून नोकरी प्राप्त होते. त्यामुळे राज्यभरातून दरवर्षी या परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. एकीकडे राज्यात सरकारी शाळेतील विद्यार्थी संख्या कोरोना नंतर वाढली आहे.परिणामी, शासनाच्या शिक्षण आयुक्तांना शिक्षण विभागाने पाठवलेल्या पत्रात 68,000 शिक्षकांची गरज असल्याचे पडताळून पाहायला सांगितल्याची बाब मागील वर्षी उघड झाली होती. तसेच रोजगार महासंकल्प मेळावा घेऊन शासनाने नोकर भरती करू म्हटल्याने याचा अर्थ शिक्षकांच्या रिक्त जागा शासन भरणार म्हणून देखील शिक्षक पात्रता परीक्षेला अधिक संख्येने उमेदवार बसतात.
ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा : विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर पाहता येईल. या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास परीक्षा परिषदेकडे उमेदवारांच्या लॉगिनमधून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताच मागील वर्षी सारखा करता येणार की नाही ते पुढील काही दिवसात स्पष्ट होईल.
हेही वाचा: Climate Change: हवामान बदलाचा सर्वाधिक धोका भारतातील नऊ राज्यांना; महाराष्ट्राचाही समावेश