ETV Bharat / state

मुंबईकरांवर मालमत्ता कर वाढीचा बोजा लादणार नाही - महापौर

मुंबई महापालिका हद्दीतील मिळतींवर दर पाच वर्षांनी कर वाढ होते. मात्र, मागील वर्षी कोरोनामुळे ही वाढ झाली. यावर्षी कर वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणण्यात आला आहे. यास काँग्रेस व भाजपचा विरोध होता. आता खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबकरांवर मालमत्ता कराचा वाढीव बोजा लादणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

किशोरी पेडणेकर
किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Jun 17, 2021, 7:53 PM IST

Updated : Jun 17, 2021, 8:17 PM IST

मुंबई - मुंबईमधील मालमत्तेवर महापालिका कर वसूल करते. हा कर दर पाच वर्षांनी वाढवला जातो. मागील वर्षी मालमत्ता करात वाढ होणार होती. कोरोनामुळे ही वाढ रोखण्यात आली. यंदा पुन्हा मालमत्ता कर वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणण्यात आला आहे. कर वाढीला काँग्रेस आणि भाजपने विरोध केला आहे. त्यानंतर मुंबईकरांवर मालमत्ता कराचा वाढीव बोजा लादणार नसल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.

बोलताना महापौर

मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव

मुंबईत प्रत्येक पाच वर्षांनी मालमत्ता करात 14 ते 15 टक्के वाढ केली जाते. सन 2015 मध्ये मालमत्ता कर वाढवण्यात आला होता. त्यानंतर 2020 मध्ये वाढ अपेक्षित होती. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे करवाढीचा निर्णय लांबणीवर पडला होता. आता पुढील चार वर्षासाठी 2025 पर्यंत पालिकेने मालमत्ता करवाढीचा निर्णय घेतला आहे. मात्र, विरोधी पक्षाने विरोध केल्यामुळे हा प्रस्ताव पुढील बैठकीपर्यंत स्थगित ठेवण्यात आला आहे. मालमत्ता कर वाढ जमीन किंवा इमारतीच्या भांडवली मूल्यावर एक एप्रिल, 2021 रोजी अंमलात असलेल्या रेडीरेकनर दरावर आधारित असणार आहे. अशी करवाढ केल्यास मुंबई महापालिकेला एक हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला असता. या करवाढीला आता विराेधी पक्षांनी विराेध केला आहे.

कारवाढीला काँग्रेस, भाजपचा विरोध

सध्या मुंबईत काेराेनाची परिस्थिती आहे. नागरिकांकडे पैसे नाहीत. गेले वर्षभर मुंबईत काेराेनाची प्रसार वाढला आहे. काेराेनाची दुसरी लाट आहे. पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांवर ही करवाढ लादू नये, अशी काॅंग्रेसची भूमिका आहे. हा करवाढीचा प्रस्ताव आल्यास काॅंग्रेस त्याला विराेध करेल. या एकवर्षात मालमत्ता करात वाढ झालेली नाही. आणखी एक वर्ष वाढ झाली नाही तरी काेणताही फरक पडणार नाही. त्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना आणि पालिका आयुक्तांना पत्र लिहीणार असल्याची माहिती पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली. तर बिल्डर आणि व्यावसायिकांना करात सूट दिली जाते. सामान्य नागरिकांना मात्र सूट दिली जात नाही. यापूर्वी वाढ केली त्यावेळी आम्ही सत्ताधाऱ्यांसाेबत हाेताे. त्यासाठी पाठिंबा दिला हाेता. मात्र, आता काेराेनाची अपवादात्मक परिस्थिती आहे. त्यामुळे मालमत्ता करात वाढ करू नये. वाढ केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी दिला आहे.

कर वाढ करणार नाही

महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव अद्याप स्थायी समितीसमोर आणलेला नाही. मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव आल्यास त्यावर स्थायी समितीत चर्चा करून याेग्य ताे निर्णय घेतला जाईल, अशी माहिती समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली होती. आज (दि. 17 जून) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. कोरोनाने मुंबईकरांचे कंबरडे मोडले असतांना प्रशासनाने अशी कर वाढ करून त्यांना आणखी त्रास देऊ नये. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत. मग अशा वेळेस मुंबईकरांच्या पाठिशी उभे राहायला हवे. मात्र, करवाढ जर लागू केली असती तरी तुम्ही का केली, असा प्रश्न विचारला गेला असता. त्यामुळे अशी दुटप्पी भूमिका आमची नाही, असे महापौरांनी म्हटले आहे.

हेही वाचा - मुंबई विद्यापीठाच्या बी. एड्. सत्र ४ परीक्षेचा निकाल जाहीर

Last Updated : Jun 17, 2021, 8:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.