नवी मुंबई - तळोजामध्ये पतीने पत्नीवर वार करुन स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गणेश दुर्गंडे व अर्चना दुर्गंडे असे दाम्पत्याचे नाव आहे.
नेमके काय घडले?
सोसायटीत दुर्गंडे दाम्पत्य राहत होते. त्यांना दीड वर्षाची मुलगी देखील आहे. गणेश व अर्चना यांच्यात नेहमी वाद होत होते. मात्र गुरुवारी सकाळी त्यांच्यातील वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात गणेशने अर्चनावर सुरीने वार केले. यात अर्चना गंभीर जखमी झाली. पत्नीवर वार केल्यानंतर गणेश घराबाहेर पडला व नावडे रेल्वे स्थानकाजवळ त्याने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली आहे. जखमी अर्चनाला नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा - चंद्रपूर जिल्ह्यातील ५४ खरेदी केंद्रांमध्ये धान खरेदी सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन