ETV Bharat / state

कोरोनामुळे निलंबीत पोलीस अधिकाऱ्यासह 3 अंमलदार सेवेत; उच्च न्यायालयात मुंबई पोलिसांचे उत्तर - घाटकोपर बॉम्ब ब्लास्ट ख्वाजा युनूस

काही दिवसापूर्वी ख्वाजा युनूस पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल असलेले अधिकारी सचिन वाझे यांच्यासह इतर ३ अंमलदारांना मुंबई पोलीस खात्यात पोलीस आयुक्तांनी पुन्हा सामावून घेतले होते.

Mumbai high court
कोविडमुळे निलंबीत पोलीस अधिकाऱ्यासह 3 अंमलदार पोलीस सेवेत; उच्च न्यायालयात मुंबई पोलिसांचे उत्तर
author img

By

Published : Jul 17, 2020, 12:37 PM IST

मुंबई - घाटकोपर बॉम्ब ब्लास्टमधील (२००२) आरोपी ख्वाजा युनूस याच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या एन्काउंटर फेम पोलीस अधिकाऱ्यासह इतरांना सेवेत रुजू करण्यात आले होते. कोरोना संकटामुळे अधिकारी सचिन वाझे व इतर ३ अंमलदारांना पुन्हा सेवेत घेण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले आहे.

काही दिवसापूर्वी ख्वाजा युनूस पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल असलेले अधिकारी सचिन वाझे यांच्यासह इतर ३ अंमलदारांना मुंबई पोलीस खात्यात पोलीस आयुक्तांनी पुन्हा सामावून घेतले होते. मुंबई पोलिसांच्या या निर्णयाला ख्वाजा युनूस याची आई आसिया बेगम यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान करीत याचिका दाखल केली होती.

ख्वाजा युनूस याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंर या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने २००४ ला पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतल्यानंतर न्यायालयाचा आदेशाचा अवमान झाल्याचा दावा ख्वाजा युनूस यांच्या आईने केला होता. ज्यावर मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना या संदर्भात प्रतिज्ञा पात्र सादर करण्यास सांगितले होते.

मुंबई पोलीस खात्याकडून मुंबई उच्च न्यायालयात उत्तर देताना सांगण्यात आले की, सध्या मुंबई शहरात कोविडमुळे मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी व अधिकारी हे संक्रमित झाले आहेत. त्या बरोबरच ४८ पोलिसांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. ५५ वार्षांपेक्षा अधिक वयाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरी थांबण्याचे आदेश देण्यात आले असून, यामुळे मुंबई पोलीस खात्यात पोलीस बळ कमी जाणवत आहे.

सध्याच्या घडीला मुंबई पोलीस खात्यात निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांच्या बाबतीत निलंबन फेरआढावा समितीसोबत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बैठक घेऊन निलंबित पोलिसांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन वाझे व इतर ३ पोलीस कर्मचाऱ्यांना ख्वाजा युनूस पोलीस कोठडी प्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश येण्या आगोदरच निलंबित करण्यात येऊन त्यांची खातेनिहाय चौकशी झाली आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान मुंबई पोलिसांकडून करण्यात आला नसल्याचे मुंबई पोलिसांकडून दाखल प्रतिज्ञा पत्रात म्हणण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.