ETV Bharat / state

'मलेरियाची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण करा' - malaria mumbai news

पावसाळ्याच्या दिवसात विविध साथीचे आजार लक्षात घेता घनकचरा व्यवस्थापन खात्याने संपूर्ण विभागाची साफसफाई करावी. तसेच, कीटकनाशक विभागाने फवारणी कामाला सर्व विभागात तातडीने सुरुवात करावी, असे आदेश महापौरांनी सहाय्यक आयुक्तांना दिले.

kishori-pednekar
महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Jun 16, 2020, 3:16 AM IST

मुंबई- मलेरियाची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी जी/दक्षिण विभागासोबतच संपूर्ण मुंबईत ड्रोन कॅमेराद्वारे सर्वेक्षण करुन ज्या-ज्या ठिकाणी मलेरिया डासांच्या अळ्या आढळून येतील त्या-त्या ठिकाणी कीटकनाशक फवारणी करण्यात यावी, असे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

सोमवारी जी/दक्षिण विभागातील विविध समस्या आणि कामांबाबत महापौरांनी सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्याकडून सखोल माहिती जाणून घेत आढावा घेतला. तसेच, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या विभाग कार्यालयातील वा‌ॅर रुमचीही महापौरांनी पाहणी केली.

पावसाळ्याच्या दिवसात विविध साथीचे आजार लक्षात घेता घनकचरा व्यवस्थापन खात्याने संपूर्ण विभागाची साफसफाई करावी. तसेच, कीटकनाशक विभागाने फवारणी कामाला सर्व विभागात तातडीने सुरुवात करावी, असे आदेश महापौरांनी सहाय्यक आयुक्तांना दिले.

या संपूर्ण कामाची सुरुवात महालक्ष्मी येथील धोबीघाट येथून करण्यात यावी. गतवर्षी ज्या ठिकाणी मलेरिया व डेंगूच्या केसेस आढळून आल्या आहेत, त्याठिकाणी अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आदेशही महापौरांनी यावेळी दिले.

दरम्यान, नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी पोलीस मैदानात कोरोनाबाधित रुग्णांसाठी विलगिकरण कक्ष उभारण्याची मागणी महापौरांकडे केली. महापौरांनी पोलीस मैदान येथे पोलिसांसाठी तातडीने विलगिकरण कक्ष सुरू करण्याचे आदेशही यावेळी सहाय्यक आयुक्तांना दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.