ETV Bharat / state

Jiah Khan Death Case: बॉलीवूड अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणी पुराव्याअभावी सुरज पंचोली निर्दोष; निकालाच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये जाणार- राबिया खान - Jiah Khan Death Case

बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यू प्रकरणात अखेर सूरज पंचोलीचा गुन्हा सिद्ध करणारा पुरावा नसल्यामुळे सत्र न्यायालयाने आज त्याला निर्दोषत्व बहाल केले. तब्बल 10 वर्षे चाललेला खटला आज समाप्त झाला. न्यायमूर्ती ए सैय्यद यांनीआज निकाल पत्र घोषित केले. मात्र जियाची आई राबिया शेख यांनी म्हटलेले आहे की, आम्ही सर्व पुरावे दिले परंतु ते सिद्ध होत नाही. म्हणून पुराव्याअभावी सुरज पंचोलीची निर्दोष मुक्तता केल्याचा निकाल देण्यात आला आहे.

Jiah Khan Death Case
बॉलीवूड अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरण
author img

By

Published : Apr 28, 2023, 2:36 PM IST

बॉलीवूड अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणी, प्रतिक्रिया

मुंबई : दहा वर्षांपूर्वी जिया खान ही आपल्या जुहू येथील घरामध्ये मृत पावली होती. आज तेरा वर्षे होत आहेत. तिच्या आत्महत्या प्रकरणामुळे बॉलीवूड क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी चर्चा झाली होती. दहा वर्षे झाले तिचा खटला सीबीआयच्या विशेष न्यायालयामध्ये सुरू आहे. याबाबत अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यूस अर्थात आत्महत्यासाठी कारणीभूत असलेला आरोपी अभिनेता सूरज पंचोली याच्याबाबत वकिलांनी युक्तिवाद केले, तर जिया खान हिच्या बाजूने देखील वकिलानी युक्तीवाद केले. सीबीआय विशेष न्यायालयाने आज केवळ आज केवळ निकालासाठी ही सुनावणी राखून ठेवली होती.

पुरावा सापडला नाही : आज निकाल घोषित होण्यापूर्वी सुरज पंचोली याला न्यायालयासमोर आरोपीच्या कक्षामध्ये हजर करण्यात आले. त्याचे नाव विचारले गेले. तुझ्याविरुद्ध कोणताही सबळ पुरावा सापडला नसल्यामुळे तुला निर्दोष म्हणून घोषित करण्यात येत आहे, असे निकाल पत्र न्यायमूर्ती ए सय्यद यांनी घोषित केला. आरोपीला केवळ एका ओळीमध्ये निर्देशत्व बहाल करत असल्याची घोषणा यावेळी न्यायमूर्तींनी केली. सविस्तर निकाल पत्र अद्याप न्यायालय प्राप्त होणे बाकी आहे.

सीबीआयने परिपूर्ण तपास केला नाही : जियाची आई राबिया खान यांचे वकील शेखर जगताप यांनी, ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना सांगितले की, न्यायालयाने जो काही निकाल दिलेला आहे. तो आम्हाला मान्य आहे. मात्र आम्ही याला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकतो, निकाल पत्र अजून आम्हाला प्राप्त झालेले नाही. ते वाचल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही ते ठरवू. परंतु सीबीआयने यासंदर्भात जियाच्या मृत्यूच्या संपूर्ण घटनांची कारणमीमांसा करण्यासाठी वस्तुनिष्ठ रीतीने जो तपास करायला हवा होता, तो परिपूर्णरित्या केला नाही, म्हणून पुराव्या अभावी सुरज पंचोली याला निर्दोषत्व न्यायालयाने दिलेले आहे हे लक्षात घ्यावे.

सुरज पंचोलीच्या वकिलाची भूमिका : सुरज पंचोली यांचे वकील प्रशांत पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला की, याबाबत सीबीआयने जो काही तपास केलेला आहे तो तपास काय झाला, कसा झाला याबाबत आत्ता बोलणे काही उचित नाही. त्याचे कारण आता अजून निकाल पत्र हाती आलेल नाहीये. न्यायालय ज्यावेळी ते निकाल पत्र अपलोड करेल, त्यावेळेला ते आम्हाला उपलब्ध होईल, परंतु न्यायालयासमोर ज्याअर्थी सीबीआयने केलेला तपास, पोलिसांनी केलेला तपास त्यातील सर्व दस्तऐवज कागदपत्रे घटनाचे विवरण या सर्व बाबी पटलावर मांडल्या गेल्या होत्या.

निकालाच्या विरुद्ध आव्हान : न्यायालयाच्या समोर वस्तुनिष्ठ रीतीने जेवढे काही पुरावे, दस्तावेज कागदपत्रे मांडायचे होते ते मांडले गेले. त्याचा न्यायालयाने पुरेपूर परीक्षण आणि त्याचा अवलोकन आणि त्यानंतर अभ्यास करून हा निकाल दिलेला आहे. त्याच्यामुळे आरोपीने मृत जिया खान हिला आत्महत्येसाठी प्रेरित केले, असे सिद्ध करणारा एक देखील पुरावा त्यांच्याकडून सादर होऊ शकलेला नाही. जिया खान हिच्या आई राबिया खान या अनेक वेळा एकच विषय घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल करायला गेल्या होत्या. परंतु त्या संदर्भात एकच विषय वारंवार घेऊन येण्याबद्दल न्यायालयाने त्याबाबत नापसंती देखील व्यक्त केली होती. ही देखील माहिती वकील प्रशांत पाटील यांनी दिली. अर्थात प्रत्येकाला निकालाच्या विरुद्ध वरच्या न्यायालयामध्ये आव्हान देण्याचा अधिकार आहे, त्याबाबत आम्ही काही म्हणू शकत नाही.

निकालाच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये : जियाच्या आईचे असे म्हणणे आहे की, जियाचा खून झालेला आहे. या दृष्टीने सीबीआयने तपास केलेला नाही. तपासच अशा पद्धतीने झालेला आहे की, पुराव्याअभावी तो निर्दोष म्हणून बहाल केला गेलेला आहे. जर यांना पुरावा सापडत नाही, त्यामुळे पुरावा सिद्ध होत नाही. पण माझ्या मुलीने काय गुन्हा केला होता. मग ती कशामुळे मेली ? मी सर्व पुरावे यामध्ये मांडलेले आहे. परंतु न्यायालयाने जे काही उपलब्ध पुरावे आणि त्याच्या आधारे विचार केलेला आहे, त्यांना असे आढळले की, यामध्ये कुठलाही दोष सिद्ध करणारा पुरावा नाही. या निकालाच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये आम्ही जाऊ शकतो, अशी जिया खानची आई आणि त्यांचे वकील यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. परंतु निकाल पत्र न्यायालयाकडून मिळायला काही दिवसांचा अवधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा : Jiah Khan Death Case : जिया खान आत्महत्येप्रकरणी सुरज पांचोलीची निर्दोष मुक्तता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.