ETV Bharat / state

suraj chavan on Ramdas kadam : कदम म्हणतात वाद मिटला, तर अजित पवारांवरील टीकेवरुन सूरज चव्हाणांनी सुनावलं - मराठा आरक्षण

Suraj Chavan on Ramdas kadam : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेमधील ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तीकर आणि नेते रामदास कदम यांच्यातील वाद मिटल्याची माहिती ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर माध्यमांना दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) काही करू शकतात असा उपरोधीक टोला रामदास कदम यांनी लावल्यानंतर अजित पवार गटाने कदम यांच्यावर पलटवार केला आहे.

suraj chavan on Ramdas kadam
सुरज चव्हाण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 10:58 PM IST

प्रतिक्रिया देताना सुरज चव्हाण

मुंबई Suraj chavan on Ramdas kadam : शिंदे गटातील दोन ज्येष्ठ नेत्यांचे मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून तिकीटाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसापासून आरोप प्रत्यारोप सुरू होते. याच पार्श्वभूमीवर खासदार गजानन कीर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. तर मंगळवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भेट घेतली. आमच्या दोघातील वाद आता शंभर टक्के मिटला असून कीर्तीकर आगामी लोकसभेचे उमेदवार असल्यास आपल्याकडून विरोध केला जाणार नसल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं आहे. वाद थांबल्या बाबतचा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांना आपण दिला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

दादा दादा आहे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातील प्रश्नाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उत्तर देताना म्हटलं की, अजित दादा काही करू शकतात, उपमुख्यमंत्री होताच शरद पवारांना भेटतात तसेच, त्यांचे आमदार मुख्यमंत्र्याचे विरोधात आंदोलन करू शकतात. मराठा आरक्षण तापलं असताना त्यांना डेंग्यू होऊ शकतो. दादा हे दादा आहेत असं म्हणतात अशा शब्दात अजित पवार यांना कदम यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.

रडायची वेळ येते : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या टीकेला अजित पवार गटाने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. अजित पवारांवर बोलवं आपण इतके मोठे नेते नाही. अजित पवार आपल्या आकलना बाहेरचे नेते असल्याचं लक्षात ठेवा असा इशारा अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी रामदास कदम यांना दिला आहे. पवार एकत्रित भेटण्याच्या प्रश्नावर, पवार कुटुंबाने महाराष्ट्रातील सांस्कृतिक जपण्याचं काम केलं आहे. सुखदुःखात सर्व राजकीय मतभेद बाजूला सारून एकत्र येणं ही आपली संस्कृती आहे. त्याला राजकीय रंग देण्याचं काम आपल्यासारखा ज्येष्ठ नेत्याकडून होत आहे हे दुर्दैव आहे, असे ते म्हणाले. पवार कुटुंब आणि अजित पवार आपल्या अकलना बाहेरचा विषय आहे, आपलं जेवढं आकलन आहे तेवढेच वक्तव्य करावं नाहीतर डोळ्याला झंडू बाम लावून रडण्याची वेळ येते, असा सल्ला देखील चव्हाण यांनी कदम यांना दिला आहे.

हेही वाचा -

  1. Ramdas Kadam on Gajanan Keertikar : कोणत्याही परिस्थितीत आपला एक खासदार कमी होता कामा नये - रामदास कदम यांची स्पष्टोक्ती
  2. Lok Sabha Elections २०२३ : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरुन रस्सीखेच; रामदास कदमांनी थेटच सांगितलं
  3. Prithviraj Chavan On Loksabha Election: पंतप्रधान लोकसभेच्या निवडणुका मुदतीआधी घेतील, कारण... पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.