मुंबई Supriya Sule On Election 2024 : शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या जानेवारी महिन्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन खडसे रस्त्यावर उतरणार आहेत. (NCP meeting regarding election) महाराष्ट्रातील गंभीर प्रश्न, खासदारांचे झालेले निलंबन, महिलांवर होणारे अत्याचार या संदर्भात माहिती घेऊन जिल्ह्यात जाऊन सर्वांना न्याय देण्यासाठी त्या महाराष्ट्र दौरा करणार आहेत. केंद्र आणि राज्यसरकार अन्याय करत आहे. सायबरचा कायदा आणला आहे. आता कोणाचाही फोन रेकॉर्ड केला जाणार आहे. केंद्र सरकारनं तीन कायदे विरोधी पक्ष नसताना पारित करून घेतले आहेत. ते असंवैधानिक असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. महिला आघाडी सक्षम करण्याचं काम केलं जाणार आहे. केंद्र आणि महाराष्ट्र यांचा क्राईमचा डेटा अतिशय चिंताजनक आहे. यासाठी राज्य सरकारची यंत्रणा काय असणार आहे? या सर्व गोष्टीं संदर्भात आवाज उठवला जाणार आहे.
कोण कुठून लढणार लवकरच समजेल - महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या बैठकीच्या माध्यमातून कोण कुठली निवडणूक लढेल हे पुढच्या 15 दिवसात कळेल, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबाबतच्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्रीय निवडणूक आयोगावर आपला पूर्ण विश्वास असून आम्हाला योग्य न्याय मिळेल. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीची एकवाक्यता आहे. इंडिया आघाडीच्या एकाजुटीला ताकदीला केंद्र सरकार घाबरलं आहे, म्हणून आम्हाला बाहेर काढलं.
दिल्लीत दडपशाही सुरू : मला दडपशाही मान्य नाही, दिल्लीत जे चाललंय त्यावर विश्वास ठेवा. ते लोकशाही वाचविण्यासाठी सुरू आहे. अशोक चव्हाण भाजपात जाणार आहेत, यावर बोलताना अशा प्रकारच्या गोष्टी मला माहीत नाहीत, त्यांना विचारा. जागा वाटपाबाबत इथे आणि दिल्लीत चर्चा होईल. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू आहे. चर्चा होऊ द्या, त्यानंतर तुम्हाला कळेल. अजित पवार यांच्यावरील आरोपाबाबत तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारावा. मुश्रीफ यांच्या बाबत माझ्या मनात प्रेम आहे. मुश्रीफ आरोपी आहेत की नाही हे भाजपाने सांगावे. समरजित घाटगे यांच्यावर अन्याय झाला तर भाजपाने माफी मागावी. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही अडचण असेल असं म्हणणं बाळबोध बोलण्यासारखे होईल. मराठा आरक्षणा बाबत सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा सुरू होती. सरकारने 24 तारखेची कमिटमेन्ट केली असेल, तर सरकारकडे काहीतरी मार्ग असेल तोपर्यंत सरकार काय निर्णय घेते ते बघूया, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दिल्लीत अघोषित आणीबाणीचा अनुभव : मॅच फिक्सिंग करणे ही चांगली गोष्ट नाही. लोकशाहीत आपलं मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. भाजपा महिला विरोधी पक्ष आहे. महिला कर्तृत्ववान, सक्षम झाल्याचं भाजपाला आवडत नाही. देशात अघोषित आणीबाणी निर्माण झाल्याचं आम्हाला दिल्लीत पदोपदी अनुभवायला मिळत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
हेही वाचा: