मुंबई - वर्धा येथील हिंगणघाट येथे एका महाविद्यालयीन शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या घटनेचा निषेध केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी अशा व्यक्तींनी कठोर शिक्षा झाली पाहिजे असेही सुळे म्हणाल्या.
-
आज वर्धा जिल्ह्यात एका मुलीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा खा. @supriya_sule यांनी जाहीर निषेध केलाय. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या अशा घटनांना आळा बसण्यासाठी अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षाच झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. pic.twitter.com/PJC8fgJMfs
— NCP (@NCPspeaks) February 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">आज वर्धा जिल्ह्यात एका मुलीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा खा. @supriya_sule यांनी जाहीर निषेध केलाय. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या अशा घटनांना आळा बसण्यासाठी अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षाच झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. pic.twitter.com/PJC8fgJMfs
— NCP (@NCPspeaks) February 3, 2020आज वर्धा जिल्ह्यात एका मुलीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा खा. @supriya_sule यांनी जाहीर निषेध केलाय. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या अशा घटनांना आळा बसण्यासाठी अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षाच झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. pic.twitter.com/PJC8fgJMfs
— NCP (@NCPspeaks) February 3, 2020
हिंगणघाटमधील नांदोरा चौकात आज (सोमवार) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये तरुणी जखमी झाली असून, तिला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. तिची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेचा सुप्रिया सुळेंनी निषेध केला आहे. अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.