मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने कोणाताही निर्णय दिला नाही. न्यायालय याबाबत उद्या मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय देणार आहे.
- Live Updates -
- 8.22PM- ओळख परेड करून जनतेने निवडून दिलेल्या आमदारांचा आणि लोकांचा अपमान
- 8.22PM- फोटोग्राफर तुमचा फोटो तुमचा पण या रेसची सांगता देवेंद्र फडणवीस, अजित पवारच करणार
- 8.5PM- राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सर्व आमदारांना एकत्र राहण्याची शपथ
- 8.05PM- सदस्यत्व जाण्याची भीती बाळगू नका शरद पवारांचा नवनिर्वाचीत सदस्यांना धीर
- 8.00PM- महाराष्ट्रात काहीही खपवून घेणार नाही- शरद पवार
- 7.55PM- आडवे आलात तर ओलांडून दाखवू- उद्धव ठाकरे
- 7.52PM- समोर येऊन दाखवा, दाखवूनच देऊ- उद्धव ठाकरे
- 7.50PM- काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले
- 7.43PM- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी या शक्तीप्रदर्शमासाठी उपस्थित
- 7.40PM- तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबतच सर्वच घटक पक्षांचे नेतेही उपस्थित
- 7.30PM- काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार एकत्र
- 7.10PM- उद्धव ठाकरे हयातमध्ये पोहोचले...या आधीच सुप्रिया सुळे हयातमध्ये उपस्थित
- 7.00PM- काँग्रेस नेतेही काही वेळात दाखल होणार आहेत.
- एनसीपी आमदार जितेंद्र आव्हाड, विद्या चौहाण ग्रँड हयात हॉटलमध्ये पोहोचले,
- 6.55PM- महाविकास आघाडीचे १६२ आमदार शक्तिप्रदर्शनासाठी एकत्र
- मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन
- एनसीपी आमदार जितेंद्र आव्हाड, विद्या चौहाण ग्रँड हयात हॉटेल येथे पोहोचले.
- साडेसात वाजेपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सगळे आमदार एकत्रित माध्यमांसमोर येऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
- त्यासाठी लेमन ट्रि हॉटेलमध्ये असणारे शिवसेनेचे आमदार आणि जेडब्ल्यू मॅरियेट मध्ये असणारे काँग्रेसचे आमदार थोड्याच वेळात हयात हॉटेलमध्ये येणार आहेत.
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ग्रँड हयात हॉटेलवर पोहोचले... सुप्रिया सुळे, पवार एकाच गाडीतून हयात हॉटेलवर दाखल
हंगामी विधानसभा अध्यक्षपदासाठी ही पाच नवे चर्चेत-
१ बाळासाहेब थोरात
२ बाळासाहेब विखे पाटील
३ दिलीप वळसे पाटील
४ बबनराव पाचपुते
५ कालिदास कोळमकर
अजित पवार, वळसे पाटील, भुजबळांमधील बैठक संपली, मनधरणीचे आणखी प्रयत्न सुरू
देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला पदभार, केली पहिली स्वाक्षरी
शिवसेनेचे आमदार 'ललित'मधून हॉटेल 'लेमन ट्री'मध्ये
महाराष्ट्रात भाजपाप्रणित सरकार स्थापनेविरोधात युवा काँग्रेसचे आंदोलन
- सर्वोच्च न्यायालयातील घडामोडी -
- दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला असून, यावर मंगळवारी सकाळी १०:३० सुनावणी होणार आहे.
- आम्ही बहुमत चाचणीत हरलो तरी चालेल, पण चाचणी आजच घ्या - अभिषेक मनू सिंघवी
- सभागृहातील सर्वात ज्येष्ठ आमदारांना हंगामी अध्यक्ष बनवून तातडीने बहुमत चाचणी केली पाहिजे - अभिषेक मनु सिंघवी
- राष्ट्रवादीकडून नवीन पत्र न्यायालयात सादर
- ही याचिका खूप मर्यादित आहे, पण दोन्ही पक्ष याला विनाकारण वाढवत आहेत - न्यायमूर्ती खन्ना
- पत्रावर सह्या आहेत, पण पाठिंबा नाही, तातडीने विश्वासमत घ्यावे - अभिषेक मनू सिंघवी
- पंतप्रधानांच्या विनंतीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीशिवाय निर्णय ही आणीबाणीची तरतूद आहे - कपिल सिब्बल
- 24 तासात बहुमत चाचणी व्हावी - कपिल सिब्बल
- 22 तारखेला एक पत्रकार परिषद झाली, यात ठरलं की तिन्ही पक्ष सोबत आहेत, हे कळताच फडणवीस राजभवनात पोहचून पत्र देतात हे चुकीचे आहे, सकाळी 5 वाजता राष्ट्पती शासन काढण्याची घाई का? - कपिल सिब्बल (शिवसेना वकील)
- एवढे पहाटे राष्ट्रपती राजवट शिथील कशी? कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद
- देवेंद्र फडणवीसांकडे आज बहुमत आहे का? जस्टीस खन्ना यांचा रोहतगींना प्रश्न
- बहुमताची खात्री पटल्यानंतरच शपथविधी, तुषार मेहतांचा युक्तीवाद
- बहुमत आहे, तर विश्वासदर्शक ठराव का मांडत नाही? सुप्रीम कोर्टाचा भाजपचे वकील मुकुल रोहतगी यांना सवाल
- मी भाजप आणि काही अपक्ष नेत्यांचा वकील आहे, आमच्या निवडणुकीपूर्वी युती केलेल्या मित्रपक्षाने शब्द पाळला नाही, राष्ट्रवादी सोबत आली, दोन्ही पवारांमध्ये वाद आहे, यात आमचा काय दोष? मुकुल रोहतगींचा युक्तिवाद
- तुषार मेहता- 170 आमदारांचं समर्थन पत्र मिळाल्यानंतरही राज्यपालांनी चौकशी करायला हवी होती का ?त्यांना पत्र मिळालं त्यामुळे त्यांनी आमंत्रण दिलं आणि देवेंद्र फडणीस यांच्या सकाळी शपथविधी झाला.
- अजित पवार राष्ट्रवादीचे गटनेते, 54 आमदारांच्या पाठिंब्याचा पत्रात उल्लेख, राज्यपालांचं काम शहानिशा करण्याचं नाही, तुषार मेहतांचा युक्तिवाद
- देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 170 आमदारांचे समर्थन, भाजपचे 105 तर ऱाष्ट्रवादीचे 54 आमदार, फोडाफोडीचा प्रश्नच नाही, बहुमताची खात्री पटल्यानंतरच राज्यपालांकडून शपथविधी, तुषार मेहतांचा युक्तिवाद
- देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापण्यासाठी आमंत्रित करणारे राज्यपालांचे पत्र तुषार मेहता यांनी खंडपीठाकडे दिले, अजित पवारांनी राज्यपालांना 22 नोव्हेंबरला दिलेले पत्रही मेहतांनी कोर्टाला सोपवले.
- तुषार मेहता - राष्ट्रवादीकडे 54 आमदार आहेत. ते संपूर्ण आमदारांनी अजित पवारांची गटनेता म्हणून निवड केली आहे. त्यांचे प्रतिनिधीत्व अजित पवार करतात. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात जास्त वेळ राष्ट्रपती राजवट ठेवणे शक्य नाही. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीला राज्यपालांनी सरकार स्थापनेची संधी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 105 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आहे. तर, अजित पवार यांच्याकडे 54 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आहे.ही दोन्ही पत्रे गृहीत धरून राज्यपालांनी निर्णय घेतला आहे.
- अजित पवारांच्या पत्रावर 54 आमदारांच्या सह्या, 22 नोव्हेंबरची पत्रावर तारीख
- महाराष्ट्राच्या सत्तापेचावरसुप्रीम कोर्टात सुनावणी; तीन न्यायमूर्तींच्या विशेष खंडपीठासमोर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर सुनावणीला सुरुवात
हे मांडताहेत यांची बाजू -
- तुषार मेहता - राज्यसरकार
- मुकूल रोहतगी - भाजपचे वकील
- मनिंदर सिंह, अजित पवारांचे वकील
- कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी - महाआघाडी
लोकशाहीची हत्या थांबवा, सोनिया गांधीसह यांच्यासह काँग्रेस नेत्यांचे संसदेत आंदोलन
11.00 AM - शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांनी राजभवनात जाऊन आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले आहे. यात त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा करण्यात आला आहे.
10.41 AM -महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवनात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली
10.31 AM - अजित पवार निर्णयावर ठाम; छगन भुजबळ यांच्यासोबत दीड तास चर्चा
10.20 AM - महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार, 160 आमदारांच सह्यांचे पत्र सादर करणार
10.20 AM - सत्ता नसेल तर भाजपवाले वेडे होतील, आमचे सरकार आल्यावर वेड्यांचे इस्पितळ काढू - संजय राऊत
10.08 AM - महाआघाडीचे नेते न्यायालयात दाखल
10.08 AM - शिवसेना नेते अनिल देसाई न्यायालयात दाखल
10.02 AM - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार थोड्याच वेळात मंत्रालयात पदभार स्वीकारणार
10.02 AM - शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अनिल देसाई आमदारांच्या सह्यांचे पत्र घेऊन दिल्लीला रवाना
09.48 AM - अजितदादांनी चूक केली आहे, त्यांनी राजीनामा द्यावा - नवाब मलिक
09.48 AM - अजित पवारांचा निर्णय हा पक्षाचा नाही - शरद पवार
09.48 AM - अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, केसी वेणुगोपाल आणि कॉंग्रेस पक्षाचे अन्य नेते सोनिया गांधींच्या निवासस्थानी, महत्वाची बैठक सुरु
09.18 AM - छगन भुजबळ अजित पवार यांच्या भेटीला; तिसर्या दिवशी देखील मनधरणीचे प्रयत्न सुरू
08.33 AM - राष्ट्रवादीचे तीन आमदार माघारी, अजित पवारांसोबत एकच आमदार
08.07 AM - 52 आमदार आमच्यासोबत, 1 संपर्कात - नवाब मलिक
07.46 AM - काय योग्य-अयोग्य हे लोकांना समजेल - छगन भुजबळ
07.10 AM - शरद पवार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडला रवाना
राज्यातील सत्ता पेचावर सर्वोच्च न्यायालयात रविवारी सुनावणी झाली. शिवसेनेच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यांनी राज्यपालांच्या एकूण कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला. राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस कशाच्या आधारावर केली? फडणवीस सरकारकडे बहुमत असल्याची खात्री कशी केली? या सारखे अनेक प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केले.
हे सरकार नियमबाह्य असून तत्काळ महाआघाडीला सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. दरम्यान, या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने संबधित केंद्र सरकार, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या पत्रव्यवहारासंबंधिची कागदपत्रे सादर करण्याबाबत नोटीस बजावली आहे.