मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी कबीर कला मंचची कार्यकर्ता असलेली ज्योती जगताप हिला सप्टेंबर 2020 मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने कारवाई करत अटक केली होती. त्यानंतर एक महिन्यांनी ज्योती जगताप हिच्यावर आरोपपत्र दाखल केले गेले होते. आरोपी असलेल्या ज्योती जगतापच्या वतीने ज्येष्ठ वकील निर देसाई आणि अपर्णाभट यांनी बाजू मांडली, तर प्राध्यापिका शोमा सेन यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आनंद ग्रोव्हर यांनी बाजू मांडली.
जामीन मिळण्यासाठी न्यायालयात धाव : अटक झाल्यानंतर सत्र न्यायालयामध्ये 2019 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ज्योती जगताप आणि शोमा सेन यांनी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर यांचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळेच एनआयएच्या विशेष न्यायालयामध्ये त्यांचा खटला चालवला गेला. म्हणून शोमा सेन यांनी 2020 मध्ये जामीन मिळावा, याकरिता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 2022 या कालावधीमध्ये सर्वात तरुण असलेली कबीर कला मंचाची गायक आणि कार्यकर्ती आरोपी ज्योती जगताप हिने जामीन मिळण्यासाठी याचिका केली होती. मात्र उच्च न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळून लावला होता. ज्योती जगताप हिच्यावर कायद्याअंतर्गत प्रतिबंधित असलेल्या संघटनेचे सदस्य असल्याचा आरोप आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणानांना नोटीस : शासनाने ज्यांना अटक केली, त्या प्राध्यापिका शोमा सेन या महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत. दलितांच्या, आदिवासींच्या अधिकारासाठी त्या काम करतात. त्यांना सहा जून 2018 या दिवशी अटक करण्यात आली होती. यादी एनआयएच्या विशेष न्यायालयामध्ये जाण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. तिथे गेल्यानंतर पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यामुळेच त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती अनिरुद्ध भोस आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या द्विखंडपीठाने ज्योती जगताप आणि शोमा सेन यांच्या जामीनाच्या अर्जावर महाराष्ट्र शासनाने आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा यांना नोटीस बजावली की, तुम्ही याबाबत त्वरित आपले उत्तर दाखल करा.