ETV Bharat / state

Sunil Tatkare On Jayant Patil : जयंत पाटीलच 'पवारांचा' करेक्ट कार्यक्रम करतील - सुनील तटकरेंचा मोठा दावा

Sunil Tatkare On Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (State President of Sharad Pawar Group Jayant Patil) हे योग्य वेळ येताच करेक्ट कार्यक्रम करतील. तसंच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission) सुरू असलेल्या सुनावणी संदर्भात आपल्याला निश्चित खात्री आहे की, लोकशाही मार्गाने (Jayant Patil) आम्ही पाऊल उचललं आहे. त्यामुळे निवडणूक आयोग पक्षाचे चिन्ह आणि नाव आमच्याकडेच सुपूर्द करेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (State President of Ajit Pawar Group Sunil Tatkare) यांनी केला आहे. (Sunil Tatkare)

Sunil Tatkare On Jayant Patil
सुनील तटकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 7:18 PM IST

सुनील तटकरे हे जयंत पाटलांविषयी मत मांडताना

मुंबई Sunil Tatkare On Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या सुनावणी संदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, आम्ही लोकशाही मार्गाने पक्षातून बाहेर पडलो आहोत. प्रफुल पटेल यांनी दावा केल्याप्रमाणे 43 आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. तर नागालँडमधील सात आमदारांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग निश्चितच आमचा विचार करेल आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आमच्या मागणीला यश येईल. केंद्रीय निवडणूक आयोग निश्चितच आम्हाला पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव सुपूर्द करेल, असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केला.

आमचे संख्याबळ स्पष्ट होणार : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने ज्याप्रमाणे आमदारांच्या अपात्रतेबाबत अर्ज दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा काही आमदारांच्या अपात्रतेबाबत अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी ज्या आमदारांबाबत अपात्रता अर्ज दाखल केले आहे ते पाहता आमच्याकडचे संख्याबळ निश्चितच स्पष्ट होते असंही तटकरे म्हणाले. पक्षाची भूमिका ही नेहमीच भाजपाला पाठिंबा देण्याची राहिली आहे. 2014 मध्येही आम्ही बाहेरून पाठिंबा दिला होता. 2019 मध्येही भाजपासोबत जाण्याचा विचार सुरू होता. इतकेच काय शिंदे बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या झालेल्या बैठकीत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं.

जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतील : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आपल्या संपर्कात आहेत का आणि ते आपल्याकडे येणार आहेत का? असं विचारलं असता जयंत पाटील यांचा स्वभाव अतिशय शांत आहे. ते काय करतात ते कुणाला कळत नाही. त्यांच्या कृतीचा अंदाज येत नाही. मात्र योग्य वेळ येताच ते नक्कीच करेक्ट कार्यक्रम करतील असा दावा तटकरे यांनी यावेळी बोलताना केला.

हेही वाचा:

  1. Uddhav Thackeray On Eknath Shinde : 'आज अजित पवार त्यांच्या उरावर...', उद्धव ठाकरेंची जोरदार टोलेबाजी
  2. MP Praful Patel : शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्यावर प्रफुल पटेल म्हणाले...
  3. Uddhav Thackeray On Nanded Death Case : राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा; कोरोना काळात लसींचा तुटवडा नव्हता, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.