ETV Bharat / state

Sunil Tatkare On CM : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांच्यात कोल्ड वॉर? सुनील तटकरेंनी दिले 'हे' स्पष्टीकरण - State president of Ajit Pawar group Sunil Tatkare

राज्यात शिंदे-फडणवीस-पवार महायुती सरकार कार्यरत आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) सत्तेत आल्यापासून शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विरोधक कोणत्या ना कोणत्या कारणावरून शिंदे सरकारला लक्ष्य करत असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांच्यात शीतयुद्ध सुरू (Cold war between CM and Deputy CM) असल्याचा दावा केला जात होता. मात्र असे कोणतेही शीतयुद्ध नसल्याचे स्पष्टीकरण अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (State president of Ajit Pawar group Sunil Tatkare) यांनी दिले आहे.

Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath Shinde
author img

By

Published : Aug 11, 2023, 4:36 PM IST

Updated : Aug 11, 2023, 6:40 PM IST

सुनील तटकरे माध्यामांशी संवाद साधताना

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) सत्तेवर आल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली असून विरोधकांकडून शिंदे सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Leader of Opposition Vijay Wadettiwar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर (Cold war between Chief Minister and Deputy Chief Minister) सुरू असल्याचा दावा केला होता. यावर असे कोणतेही कोल्ड वॉर नसल्याचे स्पष्टीकरण अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे.

कोणतही कोल्ड वार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली एक वॉर रूम तयार करण्यात आली आहे. त्यांच्या रूममध्ये ज्या विषयाला प्राधान्य आहे, त्याच विषयाचा आढावा ते घेत असतात. अजित पवारांकडे अर्थ, नियोजन खाते असल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचीमधील प्रकल्पांना दिले जात आहे. काही तरतुदींबाबत अशा प्रकल्पांचा आढावा घेणे गैर नाही, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात शीतयुद्ध नसल्याचा निर्वाळा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला आहे.

दोन ठिकाणी ध्वजारोहण : राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळी भूमिका घेतल्यानंतर आम्ही कोणत्याही पक्षाच्या कार्यलयावर दावा करणार नाही. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात ध्वजारोहण होते असते. यावर्षी राष्ट्रवादीचे दोन गट पडल्याने दोन्ही ठिकाणी ध्वजारोहण केले जाईल. मंत्रालयासमोरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ध्वजारोहणासाठी आपण उपस्थित राहणार, असे तटकरे यांंनी म्हटले आहे.

महामंडळाच्या नियुक्त्या लवकरच : महायुतीची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीमध्ये शिवसेनेकडून चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आशिष शेलार, शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, राहुल शेवाळे आणि राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. पंधरा दिवसांपूर्वी आमची बैठक झाली. तालुकास्तर ते जिल्हा स्तरावर समन्वय निर्माण करणे हा आमच्या समितीचा अजेंडा आहे. प्राथमिक बैठकीत आम्ही राज्य सरकारच्या विविध महामंडळे, विविध जिल्हा समित्या आणि राज्यस्तरीय समित्यांवर चर्चा केली. पुढील बैठकीत याबाबत सखोल चर्चा करून निर्णय घेऊ. निर्णयानंतर नियुक्तीबाबतचा प्रस्ताव एकमताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल, असे तटकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. Independence Day : पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच असताना तात्पुरत्या नियुक्त्या जाहीर, तुमच्या जिल्ह्यात कोणते मंत्री करणार ध्वजारोहण?
  2. Babasaheb Ambedkar Statue : इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा होणार; राज्य सरकारचा हिरवा कंदील
  3. Parliament Monsoon Session 2023 : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधक आक्रमक; अमित शाहांनी लोकसभेत मांडले नागरिक सुरक्षा विधेयक

Last Updated : Aug 11, 2023, 6:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.