मुंबई - मागच्या निवडणूकीत युती नसतानाही सुनिल राऊत निवडून आले होते. आता तर युती आहे यामुळे यावेळीही राऊतच निवडून येणार, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
आज (बुधवार) विक्रोळी विधानसभा मतदारसंघांतून शिवसेनेचे सुनील राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सुनील राऊत यांच्या भांडुप विलेज रोड येथील कार्यालयातून विक्रोळी मतदान कार्यालयापर्यंत रॅली काढत शक्तीप्रदर्शन करण्यात आले. सुनील राऊत यांच्यासोबत त्यांचे भाऊ आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि आदेश बांदेकर यांनी यावेळी विशेष उपस्थिती लावली होती.
हेही वाचा - केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या घरी चोरी, आरोपी अटकेत